एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai NCB Raid LIVE: : क्रूझवर NCBची मोठी कारवाई, बड्या अभिनेत्याचा मुलगा सहभागी, पाहा घटनेचे प्रत्येक अपडेट्स

NCB Raid On Cruise Party: मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आता एनसीबीनं एका क्रुझवर छापा मारत एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह दहा लोकांना ताब्यात घेतलं आहे.

LIVE

Key Events
Mumbai NCB Raid LIVE: : क्रूझवर NCBची मोठी कारवाई, बड्या अभिनेत्याचा मुलगा सहभागी, पाहा घटनेचे प्रत्येक अपडेट्स

Background

NCB Raid On Cruise Party: मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आता एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह दहा लोकांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ टर्मिनलवरुन एक क्रूझ लक्ष्यद्वीपकडे जाणार होती. ज्यात एनसीबी अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती आहे. या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे काही जणांना घेऊन एनसीबी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती आहे.

मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं ड्रग्ज जप्त, NCBची कारवाई, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ड्रग्ज पाठवलं जात असल्याची   

त्यानंतर अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारत दहाहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, काही जणांची रात्रीत चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 8 ते 10 जणांपैकी एक जण बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याचा मुलगा देखील असल्याची माहिती आहे. यात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जरी असलं तरी आज कुणालाही कोर्टात हजर केलं जाणार नसल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. सोबतच कोणालाही अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीत काय माहिती पुढे येते आणि बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाते का? हे पाहाणं महत्त्वाचे असणार आहे. सोबतच आणखी एका अभिनेत्याची मुलगी देखील यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

NCB Drug Arrest :1 कोटींचे ड्रग्ज जप्त, 5 पेडलर्सना बेड्या, भायखळा, रे रोड, बलार्ड पिअर भागात कारवाई

या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या लोकांची आज चौकशी होणार आहे. अद्याप कुणाला अटक केलेलं नसल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज चौकशीदरम्यान नेमकी काय माहिती समोर येतेय याकडे लक्ष लागून आहे. सोबतच त्या बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाईल का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. 

एनसीबी सूत्रांनी सांगितलं की, त्या बड्या अभिनेत्याच्या मुलानं चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं. त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती. त्यानं म्हटलं आहे की, माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं. 

आठ तासांहून अधिक वेळ कारवाई
ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून करण्यात आली. आठ तासांहून अधिक वेळ क्रुझवर कारवाई सुरु होती. सूत्रांनी सांगितलं की, ही क्रुझ मुंबईवरुन गोव्याला चालली होती. जशी ही क्रुझ मुंबईवरुन निघाली तशी ड्रग्ज पार्टी सुरु झाली. एनसीबीची टीम आधीपासूनच क्रुझवर होती. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाल्यानंतर क्रुझ मुंबईकडे वळवण्यात आली. 

या छाप्यामध्ये बड्या अभिनेत्यांच्या मुलांची नाव समोर येत असल्यानं छाप्यादरम्यान सर्व एनसीबीच्या टीमच्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले. छापेमारीची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांचे फोन बंद होते.  

14:18 PM (IST)  •  03 Oct 2021

क्रूझ पार्टीनंतर ताब्यात घेतलेल्यांच्या चौकशीनंतर एनसीबीची नवी मुंबईतील बेलापूरमध्ये छापेमारी

Mumbai NCB Raid LIVE: क्रूझ पार्टीनंतर ताब्यात घेतलेल्यांच्या चौकशीनंतर एनसीबीची नवी मुंबईतील बेलापूरमध्ये छापेमारी #ncb 
14:06 PM (IST)  •  03 Oct 2021

कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त

काल रात्री या क्रुझवर केलेल्या  कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. या दोन महिलांचा समावेश आहे 

14:06 PM (IST)  •  03 Oct 2021

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू

या प्रकरणी मोठी अपडेट आली असून क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे. त्याला एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना आर्यन क्रुझवर उपस्थित होता.  त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. आर्यन समवेत त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. 

11:59 AM (IST)  •  03 Oct 2021

अमली पदार्थ पार्टी प्रकरणी कठोर कार्यवाही झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, मुंबई येथील अमली पदार्थ पार्टी प्रकरणी कठोर कार्यवाही झाली पाहिजे. काल मुंबई येथे LCB कडून अमली पदार्थ पार्टी प्रकरणी एका दिगग्ज अभिनेत्याचा मुलांसह,IPS अधिकारी व मोठ्या व्यावसायिकांच्या मुलांना ताब्यात घेतले.या प्रकरणी नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी दौऱ्यावर असणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील सर्व बड्या धेंडावर कठोर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केलेय.
08:21 AM (IST)  •  03 Oct 2021

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Embed widget