एक्स्प्लोर
नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या
नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गजाआड केलं आहे. संतोष धनगाव असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 6 लाख 85 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे. या चोरट्यावर नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत.
संतोष, कळंबोलीत सोनं विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संतोषला गजाआड केलं.
नवी मुंबईत गेल्या वर्षभरात 245 घरफोड्या झाल्या आहेत. यापैकी 168 घरफोडीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलं आहे. आतापर्यंत चार टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी तब्बल 63 लाखाचा मुद्देमालही जप्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement