एक्स्प्लोर

अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकले, आरोपीची कबुली

अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन लाकूड कापण्याच्या मशिनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते वसईच्या खाडीत फेकून दिले, अशी कबुली आरोपी महेश पळणीकरने दिली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेपत्ता पोलिस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बिद्रे यांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकले, अशी धक्कादायक कबुली आरोपी महेश पळणीकर याने दिली आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणाची उकल अंतिम टप्प्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजू पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आतापर्यंत अश्विनी बिद्रे प्रकरणी फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता चौघा आरोपींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2016 रोजी चौघा आरोपींनी एकत्र येऊन हत्या केल्याची माहिती आहे. तीनच दिवसांपूर्वी पळणीकरला लाकूड कटर मशिन घरात ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावलं होतं. महेश पळणीकर हा अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र असून तो कुरुंदकरचे सर्व व्यवहार करत असे. त्याला पुण्याच्या कात्रज परिसरातून सोमवारी अटक करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी तपास गुन्हे शाखेकडे देऊन तपास अधिकारी बदली झाल्यावर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्याची मागणी अश्विनीच्या कुटुंबाने केली होती. परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. मात्र नंतर याचा तपास गुन्हे शाखेकडे गेल्यावर इतर आरोपी समोर आले असल्याचा दावा अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? 15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या तपासात पोलिसच त्याना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 साला पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.

एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं. अश्विनी आणि अभय यांच्यात वाद अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले. संबंधित बातम्या :

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाच्या तपासाला वेग, चौथा आरोपी अटकेत

बेपत्ता API बिद्रे प्रकरण : अभय कुरुंदकरच्या खासगी ड्रायव्हरला अटक

बेपत्ता API बिद्रे प्रकरण: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर निलंबित

बेपत्ता API बिद्रे प्रकरण: कळंबोली, जळगाव आणि सांगलीतून धरपकड

घराला नवा रंग, कुरुंदकरांनी बिद्रेंचा घातपात केल्याचा संशय

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत

बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Hoarding Video : मुंबईत महाकाय होर्डिंग कोसळलं, 80 गाड्या दबल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Embed widget