Vaccination : 100 टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई पहिले शहर
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 11 लाख 7 हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय
![Vaccination : 100 टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई पहिले शहर Navi Mumbai Covid-19 Vaccination 100% of Navi Mumbai population has got 1st dose of Covid 19 vaccine highest in MMR Vaccination : 100 टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई पहिले शहर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/b391f4937b071e51314cd47b69e96165_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Navi Mumbai Covid-19 Vaccination : नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय. 100 टक्के लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. तर राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. शंभर टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई राज्यातील पहिले शहर ठरलं आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 11 लाख 7 हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५२ टक्के इतकी आहे. ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क येतो असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार, ऑटो / टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती यांचेकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. बेघर, निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय यांचेकरिता तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्तींसाठी घरी जाऊन लसीकरण करण्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार करत आलं असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय..
18 वर्षांवरील 100% नागरिकांचा covid 19 लसीचा पहिला डोस पूर्ण झालेले एम.एम.आर क्षेत्रातील पहिले शहर !
— NMMC (@NMMConline) October 19, 2021
समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन आणि आभार!@abhijitbangar @NMMCCommr #MaskUpNaviMumbai#NoMaskNoEntry#covi̇d_19 #IndiaFightsCorona pic.twitter.com/YldoURIl6U
राज्यात ७० टक्के नागरिकांना पहिला डोस -
राज्यात आतापर्यंत १८ वर्षांवरील 70 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच राज्यातील लसीकरण आणखी वेगात वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला आहे. त्यामुळे भविष्यात मिशन कवच कुंडल आणखी वेगाने राबवणार आहोत. देशाच्या लसीकरणात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे, असेही टोपे म्हणाले. दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 18, 2021
महाराष्ट्राने रविवारी 9.14 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात रविवारी संध्याकाळपर्यंत 1,29,221 लोकांना लस टोचण्यात आली. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आता पर्यंत 9,14,34,586 लोकोंचे लसीकरण झोले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)