एक्स्प्लोर
नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती
मुंबई उच्च न्यायालयाचे 42 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नरेश पाटील हे आजपासून पदभार सांभाळतील. नरेश पाटील हे 13 ऑगस्ट 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहात होते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या कायदेमंत्रालयाकडे कोलेजियमनं नरेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती.
![नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती naresh patil appointed as chief justice in mumbai high court नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/02123835/Mumbai-highcourt-660x400.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे 42 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नरेश पाटील हे आजपासून पदभार सांभाळतील. नरेश पाटील हे 13 ऑगस्ट 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहात होते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या कायदेमंत्रालयाकडे कोलेजियमनं नरेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती.
साल 1979 मध्ये मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली होती. त्यानंतर फौजदारी, दिवाणी अश्या अनेक प्रकारच्या खटल्यात वकिली केल्यानंतर पुढे त्यांनी एएसजी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडण्याचंही काम केलं. त्यानंतर साल 2001 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली.
5 डिसेंबर 2017 रोजी डॉ. मंजुला चेल्लूर निवृत्त झाल्यापासून मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींचं पद रिक्त होतं. याजागी त्यानंतर डॉ. विजया कापसे-तहिलरमानी यांची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून वर्णी लागली होती. 13 ऑगस्ट 2018 रोजी त्यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर बढती देण्यात आली. तेव्हापासून सेवाजेष्ठतेनुसार नरेश पाटील यांच्याकडेच प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची धुरा सोपवण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)