एक्स्प्लोर
राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी
![राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी Narayan Rane Vs Anil Parab In Assembly Latest Updates राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/22215443/parab-rane.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या विधानपरिषेदत जुगलबंदी पाहायला मिळाली. राणेंनी शिवसेनेची ताकद संपल्यांचं म्हटल्यानंतर आक्रमक होत अनिल परब यांनी राणेंवर तोफ डागली.
अनिल परब काय म्हणाले?
“शिवसेनेची ताकद आहे, हे तुम्हाला चांगले माहिती आहे. शिवसेनेमुळे तुम्ही खालच्या सभागृहात राजे होतात, पण दुर्दैवाने आज तुम्हाला शिवसेनेमुळेच या सभागृहात यावे लागले. शिवसेनेच्या ताकदीची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही गेल्यावर देखील शिवसेनेने 2007, 2012 आणि 2017 या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेत शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. मध्यंतरी जी काही चर्चा चालू होती तसं घडून तुम्ही भाजपमध्ये गेला असतात, तर आज जीएसटीच्या बाजूने बोलला असतात. त्यामुळे शिवसेनेची चिंता तुम्ही करू नका.”, असे अनिल परब म्हणाले.नारायण राणे काय म्हणाले?
“मी शिवसेनेची ताकद कमी झाली, हे वस्तुस्थिती पाहून बोलतोय. उगाच बोलत नाही. अकोल्यात उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, त्याचा संदर्भ घेऊन मी बोललो. शिवसेनेत पूर्वी ज्याप्रमाणे बोललेलं घडायचं, तसं आता घडत नाही. लोकशाहीत सत्तेत असणाऱ्यांनी सत्तेच्या बाजूने बोलायचे असतं. विरोधात नाही, असं मला सांगायचे होतं.”, असे नारायण राणे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)