Mumbai Local Train Accident: मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट, 75 चा स्पीड अन् प्रवाशाचा बाहेर निघालेला हात; अहवालात नेमकी काय माहिती?
मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

Mumbra local Train Accident : मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, दोन्ही लोकल ट्रेनमध्ये अवघे 0.75 मीटरचे अंतर होते. विशेष म्हणजे, दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालानुसार, दोन्ही लोकल ताशी 75 किमी वेगाने धावत होत्या. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशाने दरवाज्याजवळ उभं राहताना बाहेर हात काढला होता आणि त्याच्या खांद्यावर बॅगही होती. त्याच प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडला. आणि कदाचित याच प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाश्यांना लागल्याने एका मागे एक इतर प्रवासी देखील पडले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याच घटनेत बाजूने धावणाऱ्या दुसऱ्या लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांनाही धक्का बसल्याने ते देखील खाली पडले असावेत, असे निरीक्षण अहवालात नोंदवले गेले आहे.
मुंब्रा स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही लोकल स्पष्टपणे दिसतात, मात्र दोन्ही लोकलच्या दरम्यानचे दृश्य न दिसल्याने नेमकं काय घडलं हे निश्चितपणे सांगता येत नाही. काही केवळ काही सेकंदांत हा संपूर्ण अपघात घडला, ही बाब अधिक धक्कादायक ठरते.
मुंब्रा स्थानकावर नेमका कसा झाला होता अपघात?
- दिवा ते मुंब्रा दरम्यान ही दुर्घटना घडली
- एक लोकल कसाराकडून सीएसटीकडे जात होती तर दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जात होती
- सकाळी साडे नऊ वाजता दरम्यानची घटना
- दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी पडले
- दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला
- बॅगांची गुंतागुंत झाली आणि ही घटना घडल्याची शक्यता
- पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही
- एकूण 13 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी सगळी घटना सांगितली. लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली.
मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे :
1) राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा
2) सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर
3) मयूर शाह (44 )
4) मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)
हे ही वाचा -























