एक्स्प्लोर

दिवसभर समूहगीत, चित्रपटांची गाणी, घरी जाताना 'सारे जहाँ से...'; सलीम शेखच्या बासरीचे मुंबईकर चाहते

आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही, की आपण नशिबाला दोष देत बसतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. पण सलीम शेखचं जीवन तर जन्मापासूनच अंधारमय. अशा परिस्थितीतही सलीमने न घाबरता या अंधाराशी सामना करायला सुरुवात केली.

मुंबई : नोकरी व्यवसाय आणि कामानिमित्ताने दररोज हजारो मुंबईकर दादर स्टेशनवरुन ये-जा करत असतात. यावेळी गडबडीत असणाऱ्या मुंबईकरांच्या कानावर पडतात ते सलीम शेखच्या बसरीतील मंजुळ स्वर. कितीही गडबड असली तरी आपले हात पाकिटामध्ये जाऊन त्यातले पाच, दहा रुपये मुंबईकर हळूच बाहेर काढतो आणि सलीमच्या खिशात ठेवून पुढे निघून जातो. सलीम मुंबईकरांना हवाहवासा वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे हा सलीम शेख?

दादर स्टेशनच्या रेल्वे ब्रिजवर दररोज सकाळी न चुकता सलीम शेख बासरी वाजवत उभा असतो. सलीम जन्मत: अंध आहे. अंध शाळेमध्ये कसंबसं त्याने आपले शिक्षण पूर्ण केल्यामुळे कुटुंबांनेही त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळे आता आपलं कसं होणार या विचारात नेहमीच सलीम असायचा. शाळेत असतानाच सलीम अनेक वाद्य वाजवायचा, गाणंही गायचा, एकेदिवशी सलीमचे शिक्षक मजर शेख यांनी शाळेमध्ये बासरी आणल्या. बासरीची माहिती देत त्यांनी काही गाणीही बासरीवर वाजवली आणि सलीमला या बासरीने आपल्याकडे आकर्षित करुन घेतलं. तिथून सुरु झाला सलीमचा या बासरीसोबतचा प्रवास. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही, की आपण नशिबाला दोष देत बसतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. पण सलीमचं जीवन तर जन्मापासूनच अंधारमय. अशा परिस्थितीतही सलीमने न घाबरता या अंधाराशी सामना करायला सुरुवात केली. शालेय शिक्षण संपल्यानंतर पुढे जगायचं कसं हा प्रश्न सलीम पुढे उभा राहिला होता. अशावेळी शिक्षकांनी शिकवलेली बासरी हातात घेऊन त्याने आपला प्रवास सुरु केला. दररोज सकाळी सलीम कल्याणहून दादरच्या दिशेने लोकलने येतो. दादरच्या रेल्वे ब्रिजवरुन सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांची गाणी तो बासरीवर वाजवतो. सलीमला आपण अंध असल्याची अजिबात खंत नाही. दररोज घरातून बाहेर पडत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच बाहेर पडतो. माझा आजचा दिवस इतरांप्रमाणेच चांगला जाणार हा विश्वास सलीम आपल्या मनाशी बाळगतो आणि तो मुंबईची वाट धरत असतो. सलीम भीम गीतं, समूहगीत आणि चित्रपटाची गाणी बासरीवर वाजवत असल्यामुळे दादरच्या स्टेशनवरुन जाणाऱ्या सर्वच वयोगटातील लोकांना सलीम हवाहवासा वाटतो. कारण आपण जी गाणी गुणगुणत असतो तीच गाणी सलीमच्या बासरीतून बाहेर पडत असतात. त्यामुळे अनेकांची पावलं सलीमजवळ थांबतात आणि आपल्या  खिशात असणाऱ्या पाकिटाकडे हात जाऊन सलीमच्या खिशात पाच दहा रुपयाची भेट देऊन जातात. आपली उपजीविका चालावी म्हणून सलीम बासरी वाजवत नाही, तर तिचा आनंदही घेतो, आपल्या अंधकारमय जीवनाला प्रकाशाची वाट देणारी बसरी असल्यामुळे तो तिच्यावर तितकेच प्रेमही करतो. दोन्ही हात पाय, डोळे सुस्थितीत असूनही अनेक जण लाचारीने जगत असतात. काहीजण अंध, अपंग असल्याचा फायदा उठवत भीक मागून लाचारासारखं जीवनही जगत असतात. मात्र सलीमचे हात हे भीक मागण्यासाठी नाही तर बासरीवरील स्वर आळवण्यासाठी उठत असतात याचा सलीमला ही तितकाच अभिमान वाटत आहे. सलीमचं लग्न झालं आहे. त्याला एक लहान मूल देखील आहे. ना राहायला छत, ना बँक बॅलन्स, ना कुटुंबाची मदत. हे फाटलेलं आभाळ बरोबर घेऊन सलीम हसतमुखाने दादर स्टेशनवर दिवसभर उभा असतो. त्याचा निरागस चेहरा आणि त्याच्या बासरीतून उमटणारे स्वर ऐकून येणाऱ्या-जाणाऱ्या मुंबईकरांची पाऊलं काही क्षण सलीमजवळ थांबतात. त्याला पाहतात आणि फुल ना फुलाची पाकळी देऊन ते पुढे आपली जगण्याची वाट शोधत निघून जातात. या सर्वांना सलीम हवाहवासा वाटतो, कारण सलीम दररोज जगण्याची नवी उमेद घेऊन दादर स्टेशनवर नव्याने लढत उभा राहिलेला असतो. सलीमची बासरी म्हणजे एखाद्या व्यवसायिक बासरीवादकालाही लाजवेल अशा पद्धतीने आहे. केवळ तुटपुंजे शिक्षण घेऊन त्याने बासरी वादनाची कला आत्मसात केलेली आहे. सध्याच्या फेसबुक आणि टिकटॉकच्या जमान्यामध्ये अनेकांना प्रसिद्धी मिळते तर अनेक जण  प्रसिद्धी मिळवण्यासाठी लाख धडपड करत असतात. मात्र सलीम रोजच्या जगण्याची लढाई लढण्यासाठी बासरीचे स्वरमय हत्यार घेऊन दादरच्या या पुलावर दररोज स्वरातून लढत असतो. ना जातीचा ना पातिचा... न धर्माचा .... विचार करत सलीम आपल्या बासरीतून सगळी गाणी वाजवतो आणि रात्री मुंबईकरांचा निरोप घेऊन घरी जातो. घरी जात असताना त्याच्या बासरीतून न चुकता एक गाणं वाजत असतं.... ते म्हणजे 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा'.... अशा या डोळस, लढवय्या आणि तितक्याच प्रेमळ बासरी वादकाला आता मुंबईकरांची आणि खऱ्या चाहत्यांची साथ हवी आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी... उभा राहण्यासाठी साथ हवी आहे. मुंबईकर प्रवाशांची प्रतिक्रिया - प्रशांत शिंदे - दररोज दादर स्टेशनला कामानिमित्ताने येत असतो. न चुकता मी सलीम शेखची बासरी ऐकतो. एखाद दिवस सलीम आला नाही की मलाही चुकल्यासारखं वाटतं. मी माझ्या परीने सलीमला दोन रुपयांपासून दहा रुपयांची मदत घेऊन जात असतो. सलीमची बासरी ऐकली की मन कसं प्रसन्न होतं. सुरेश राऊत - आज-काल छोट्या-मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन अनेक मुलं आणि लोकही डिप्रेशनमध्ये जातात आणि आपल्या जीवाचं बरं-वाईट करुन घेतात. त्यांना आपल्यासमोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याचं धाडस नसतं. मात्र आम्ही सलीमकडे पाहिलं की आपोआप त्याला सॅल्यूट करावासा वाटतो. स्वतः अंध असूनही डोळे असणाऱ्या माणसांना दीपस्तंभासारखे तो अप्रत्यक्षपणे मार्ग दाखवून जातोय. खरंच त्याच्या बासरीतील सुरांनी आम्हाला जगण्याची एक नवी उमेद मिळते. संजय परदेसी - सलीम दररोज किती पैसे मिळवतो हे महत्त्वाचं नाही. सलीम दररोज कसं जीवन जगतो हे महत्त्वाचा आहे. जगायला काय लागतं हे सलीमवरुन आम्हाला कळलेला आहे. नको असलेल्या अवाढव्य गोष्टींच्या मागे लागून आम्ही आमचा वेळ घालवत आहे. मात्र सलीमला त्याच्या जगण्याचा सूर गवसलेला आहे, तोही त्याच्या बासरीतून.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget