Mumbai News : प्रेयसीसाठी आयुष्य संपवलं, वरळीतील पोलीस कॉन्स्टेबलचं टोकाचं पाऊल
Mumbai News : मुंबईतील वरळी परिसरातील एका तरुणाने प्रेयसीसोबत भांडण झाल्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळीतील (Worli) पोलीस कॉन्स्टेबलने प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर गळफास घेऊन आत्महत्या केलीये. इंद्रजित सांळुखे वय 27 असं या तरुणाचं नाव असून तो मुंबईतील वरळी भागात राहणारा होता. या कॉन्स्टेबलने आधी त्याच्या गळ्यातील फासाचा फोटो काढला आणि तो आपल्या प्रेयसीच्या मैत्रिणीला पाठवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. रविवारी रात्री 10 नंतर ही घटना घडली. इंद्रजित मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात तैनात होता.
इंद्रजितचे गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. इंद्रजित हा सोशल मीडियावरुन इतर महिलांशी संवाद साधत होता, त्यावरुन त्याच्यात आणि त्याच्या प्रेयसीमध्ये भांडण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यांच्यातील या भांडणानंतर पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजित साळुंखे याने आत्महत्या केली.
वरळी सी लिंकवरुन उडी मारुन आत्महत्या
काही दिवसांपूर्वी वांद्रे वरळी सी लिंकवरुन 28 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या केली होती. आकाश सिंह असं या तरुणांचं नाव असून तो एका खासगी बँकेत कर्मचारी म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याने वांद्रे वरळी सी लिंकवरुन उडी मारली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आकाशचे त्याच्या मैत्रीणीसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवार रात्री 11.45 च्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहचल्यानंतर आकाशला मृत घोषित करण्यात आले. आकाशने उडी मारल्यानंतर समुद्रात आकाशला शोधण्यासाठी वरळी पोलिसांची बोट, अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमार बोटींचा सहभाग होता.
हेही वाचा :
Online Shopping Fraud : महिला डॉक्टरला 300 रुपयांची लिपस्टिक एक लाखाला पडली; काय झालं नेमकं