एक्स्प्लोर

Pune Crime Krishna Andekar: आंदेकर कुटुंबातील सर्वात 'सर्किट' दिवटा, 17 व्या वर्षी बंदूक हातात, पुण्याला हादरवणारा कृष्णा आंदेकर कोण?

Pune Crime Krishna Andekar: आंदेकर कुटुंबातील सर्वात तापट व्यक्ती, बंडू आंदेकरच्या राईट हँडचाच गेम करायचा प्रयत्न, 17 व्या वर्षी फायरिंग करुन जेलमध्ये गेला

Pune Crime Krishna Andekar: पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंदेकर याने मंगळवारी समर्थ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. कृष्णा आंदेकर हा बंडू आंदेकर याचा मुलगा आणि वनराज आंदेकर याचा भाऊ आहे. आंदेकर कुटुंबातील सर्वात तापट व्यक्ती आणि लहानपणापासून गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण असलेल्या कृष्णा आंदेकरचा गेल्या काही दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी सोमनाथ गायकवाडच्या मुलाला संपवण्याचा कट रचला होता. मात्र, पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला. त्यानंतर कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी नाना पेठेत राहणाऱ्या आयुष कोमकरला गोळ्या घालून ठार मारले आणि वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेतला.  

आयुष कोमकर याची 5 सप्टेंबरला रात्री नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर एकूण 9 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण झाली होती. या सगळ्या कटात कृष्णा आंदेकरचा मुख्य सहभाग होता. बंडू आंदेकर याने आंदेकर टोळीची सूत्रं हाती घेतल्यापासून त्याने आपल्या सर्व मुलांना आणि मुलींना गुन्हेगारी क्षेत्रात आणले. बंडू आंदेकरच्या मुली संजीवनी आणि कल्याणी कोमकर यांचे पती अनुक्रमे जयंत कोमकर आणि गणेश कोमकर हे बंडू आंदेकरचा ठेकेदारी आणि इतर सगळा व्यवसाय सांभाळत होते. या काळात उदयकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर,राजश्री आंदेकर हे पुण्यात नगरसेवक होते. या सगळ्यांच्या ठेकेदारीच्या कामांचा हिशेब जावई असलेले कोमकर बंधू ठेवत होते. 

तर प्रत्यक्ष गुन्हे करणे, मुलांचे खटले आणि इतर जबाबदारी ही बंडू आंदेकरचे राईट हँड आणि नंबरकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्यावर होती. हे दोघे बरीच वर्षे बंडू आंदेकरचे गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत होते. यादरम्यान बंडू आंदेकरची दोन्ही मुलं वनराज आणि कृष्णा हे मोठे झाले. ते लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या गुन्हेगारी साम्राज्याचा पसारा पाहत आले होते. यापैकी वनराज आंदेकर हा मितभाषी आणि सौम्य प्रकृतीचा होता. मात्र, कृष्णा आंदेकर याला लहानपणापासूनच गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण होते. त्याला गुन्हेगारी जगतात काहीतरी करुन दाखवण्याची खुमखुमी होती. 

याउलट वनराज आंदेकर हा गँगचा सोफिस्टिकेटेड चेहरा होता. राजश्री आंदेकर यांच्यानंतर वनराज आंदेकर हा नगरसेवक झाला. राजकारणात आणि टोळीत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला. वनराज आंदेकर महानगरपालिकेत आल्याने ठेकेदारीचे सगळे पैसे थेट त्याच्याकडे येऊ लागले. उदयकांत आंदेकर यांचाही वनराजवर विश्वास होता. वनराज आंदेकर याने आंदेकर टोळीच्या कामातही लक्ष घालायला सुरवात केली. टोळीतील मुलांच्या खटल्यांच्या तारखा,वकील आणि खटले या सगळ्यात वनराज जातीने लक्ष घालत होता. तो या सगळ्या कामात हुशार होता. हे पाहून बंडू आंदेकर याने टोळीची सूत्रं वनराजकडेच सोपवली होती. वनराज आंदेकरच्या या वाढत्या प्रभावामुळे कोमकर अस्वस्थ झाले होते. यामधूनच कोमकर आणि आंदेकर यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली.

Who is Krishna Andekar: कृष्णा आंदेकरचा उदय कसा झाला?

सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे दोघेजण बंडू आंदेकर याचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते. मात्र, कृष्णा आंदेकर वयात आल्यानंतर त्याला गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण वाटू लागले. हेच आकर्षण त्याला स्वस्थ बसून देत नव्हते. त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी होती. यामधूनच कृष्णा आंदेकर याचे सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्याशी खटके उडू लागले. या दोघांशी कृष्णा आंदेकर याचे बिलकुल जमत नव्हते. कृष्णा आणि सुरज ठोंबरे यांच्यातील वाद इतका टोकाला गेला होता की, चार वर्षांपूर्वी कोंढवा परिसरात कृष्णा आंदेकर याने सुरज ठोंबरे याच्यावर फायरिंग केली होती. मात्र, यामधून सुरज ठोंबरे बचावला होता. 

त्यावेळी कृष्णा आंदेकर हा अवघ्या 17 वर्षांचा होता. अल्पवयीन असल्याने तो शिक्षा संपवून लवकर तुरुंगातून सुटला. याच काळात सोमनाथ गायकवाड याने पोलिसांच्या मदतीने सोमनाथ गायकवाडला पुण्यात पत्त्यांचा क्लब सुरु करुन दिला. सोमनाथने क्लब चालवण्याच्या मोबदल्यात बंडू आंदेकरला विशिष्ट रक्कम द्यायची, असा व्यवहार दोघांमध्ये ठरला. मध्यंतरीच्या काळात सोमनाथला क्लबमधून जास्त पैसे मिळायला लागले. हे कृष्णाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ही गोष्ट बंडू आंदेकरला सांगितली. यामुळे बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात वाद झाला. त्यावेळी कृष्णा आंदेकर याने क्लबमध्ये शिरुन जबरदस्तीने क्लबचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. 

या वादानंतर कृष्णा आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात टोकाचे संबंध निर्माण झाले. याच रागातून कृष्णा आंदेकर याने 2023 साली सोमनाथ गायकवाड याला मारण्यासाठी सापळा रचला होता. निखिल आवाडे हा सोमनाथचा मावसभाऊ होता. एकदा तो नाना पेठेत बंडू आंदेकरच्या घरासमोर राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटायला आला होता. त्यावेळी तिकडे सोमनाथ गायकवाडही येणार होता. कृष्णा आंदेकरने त्याला मारण्यासाठी सापळा रचला होता. या कटात त्याच्यासोबत बंडू आंदेकरची मुलगी वृंदावनी कोमकर हिची दोन मुलं म्हणजे स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर हेदेखील सहभागी होते. कृष्णा आंदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नाना पेठेत निखिल आखाडेला घेरले. त्यावेळी 19 वर्षांच्या स्वराज वाडेकर याने निखिल आखाडेवर 23 वार केले. तो जिवंत राहू नये यासाठी त्याच्या डोक्यात दगडही टाकला. या प्रकरणात कृष्णा आंदेकर हा जेलमध्ये गेला. मात्र, तांत्रिक पुराव्यांमुळे त्याच्यावरील मोक्का टिकू शकला नाही आणि तो जेलबाहेर आला होता. 

आणखी वाचा

कृष्णा, तुझा एन्काऊंटर होणारंय, पोलिसांच्या फोनने तंतरली, आंदेकरचा मुलगा तातडीने पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हजर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार

व्हिडीओ

Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण
Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Embed widget