(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
आजही मुंबईत वादळी वारे वाहणार आहे. मात्र, कालच्यासारखे तीव्र स्वरुपाचे वारे (stormy winds) आज वाहणार नसल्याची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे.
Mumbai Weather Update : मुंबईकरांसाठी (MumbaiP महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आजही मुंबईत वादळी वारे वाहणार आहे. मात्र, कालच्यासारखे तीव्र स्वरुपाचे वारे (stormy winds) आज वाहणार नसल्याची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे. मात्र, संध्याकाळच्या वेळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मुंबईत 30 ते 40 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता
मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज मुंबईत 30 ते 40 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल मुंबई परिसरात 75 किमी प्रति तासाने दुपारी साडेचार वाजता वारे वाहिले होते. धुळीच्या वादळामुळं मुंबईतील दृश्यमानता 500 मी. पर्यंत खाली आली होती.
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही मुंबईकरांना मनस्ताप सहन कारावा लागू शकतो. कारण आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कालच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्याम या वादळी वाऱ्याच्या आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, काल मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच मुंबईची लाईपलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा देखील काल ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचं थैमान
दरम्यान, राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं नुकसान देखील झालं आहे. विशेषत: शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. फळबागा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान या वादळी वाऱ्यासह पावसानं झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभादानं दिलेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचा राज्यातील मुक्काम वाढला आहे. राज्यात आणखी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान अभ्यासकांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, येत्या 19 मे पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यंनी आपापल्या कामांचे योग्य नियोजन करावं असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या: