एक्स्प्लोर

मुंबईकरांनो सावधान! आज अतिमुसळधार पावसाचा इशारा,तर कोकणातही जोर वाढणार ;ठाणे, पालघर जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता

Maharashtra Rain Update : राज्यात काही ठिकाणी  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत (Heavy Rain) आहे. काही भागात या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी या पावसानं जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही  मुंबईत (Mumbai  Rain Update)  काही ठिकाणी शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात काही ठिकाणी  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसानं हजेरी लावली  आहे. मात्र, आज हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 

विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता

हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांत गुरुवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार मुंबईत शुक्रवारी पहाटे काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पालघर जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

हे ही वाचा :

आधी पावसाची प्रतीक्षा, आता अतिवृष्टीने हाल, मराठवाड्यात 39 दिवसात 28 बळी, शेतीचंही नुकसान

       

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Shivsena : प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरुन आदित्य ठाकरेंवर नाराजी, ठाकरेंचे आमदार-खासदार अस्वस्थ; शिंदेंच्या मंत्र्याचा मोठा दावा
प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरुन आदित्य ठाकरेंवर नाराजी, ठाकरेंचे आमदार-खासदार अस्वस्थ; शिंदेंच्या मंत्र्याचा मोठा दावा
Rohit Pawar on Ajit Pawar plane Crash: रोहित पवारांकडून विमानांबाबत धोक्याचा इशारा, तरीही महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, मालक स्वत: स्वागताला
रोहित पवारांकडून विमानांबाबत धोक्याचा इशारा, तरीही महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, मालक स्वत: स्वागताला

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Embed widget