एक्स्प्लोर
VIDEO : मुलुंड स्टेशनला धबधब्याचं स्वरुप
मध्य रेल्वेवरील मुलुंड स्थानकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्टेशनला नदी-धबधब्याचं स्वरुप आल्याचा अनुभव घेतला.
![VIDEO : मुलुंड स्टेशनला धबधब्याचं स्वरुप Mumbai Waterfall At Mulund Station Due To Heavy Rains Latest Update VIDEO : मुलुंड स्टेशनला धबधब्याचं स्वरुप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/30082318/Mumbai-Rain-mulund-station.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईत मंगळवारी दुपारपासून झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं. रेल्वे स्थानकांवरही पाणी साचून ट्रॅकवर पाणी आलं. मात्र एखाद्या रेल्वे स्टेशनला नदीचं स्वरुप येईल, असं तुम्हाला वाटतं का?
मध्य रेल्वेवरील मुलुंड स्थानकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्टेशनला नदी-धबधब्याचं स्वरुप आल्याचा अनुभव घेतला. मुलुंडमध्ये चक्क फलाटावरुन पाणी रुळांवर भदाभदा कोसळत होतं.
रेल्वे फलाट, रुळ, फलाटावरचे स्टॉल्स अशा सर्व ठिकाणी फक्त पाणी आणि पाणीच होतं. प्लॅटफॉर्मवरुन हे पाणी रेल्वे ट्रॅकवर पडत होतं. मंगळवारी संध्याकाळी पावणेसहा वाजता हा व्हिडिओ शूट केल्याची माहिती आहे. त्यानंतर मात्र हे पाणी ओसरलं.
मुंबईत बुधवारीही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, अन्यथा असाल तिथे- घरी, ऑफिसमध्ये सुरक्षित रहावं, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)