एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई विद्यापीठात FY-SY च्या परीक्षा कॉलेजमार्फत होणार
मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेतली जावी, अशा आशयाचा ठराव विद्या परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मुंबई : मुंबई विद्यापीठातील पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयामार्फत घेतल्या जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेतली जावी, अशा आशयाचा ठराव विद्या परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांना पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून करण्यात यावी असेही या बैठकीत ठरवण्यात आलं.
ही सर्व प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून आणि अध्ययन-अध्यापन पद्धतीचा व परीक्षांचा दर्जा उंचवण्यासाठी प्र-कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली चारही विद्याशाखेतील अधिष्ठाता मिळून समितीचे गठन केले जाणार आहे. या समितीच्या मार्फत नियमावली तयार केली जाणार असून महाविद्यालयांमार्फत घेतल्या जाणाऱ्या या दोन्ही वर्षाच्या परीक्षा आणि अध्ययन-अध्यापन यांचा दर्जा टिकवून आणि सुरळीत पद्धतीने पार पडण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात, असं सर्वानुमते विद्या परिषदेत ठरवण्यात आलं.
या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. मुंबई विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष पेपर सेटिंग आणि पेपर चेकिंगचे अधिकार महाविद्यालय स्तरावर दिले आहेत. त्यामुळे दोन कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते, तसेच मोठ्या प्रमाणात महाविद्यालय स्तरावर दुरुपयोग, पक्षपातीपणा होऊ शकतो. पदवी परीक्षेच्या प्रथम वर्ष ते तृतीय वर्षापर्यंत ग्रेड देण्यात येते. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून आम्ही त्याचा निषेध करतो, तसेच विद्यापीठाचे खाजगीकरणच करायचे असेल तर त्यापेक्षा विद्यापीठाला टाळे लावा आणि बंद करुन टाका, असं मत छात्र युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement