एक्स्प्लोर

Mumbai Rain Death: मुंबईत बीएमसीच्या मुर्दाड कारभाराचा आणखी एक बळी, कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, मनसैनिक पोलिसांना भिडले

Mumbai Tree Collapse : कुर्ल्यातील या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व झाड छाटणीच्या दाव्यांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे कुर्ला (पश्चिम) परिसरात एक अतिशय भीषण दुर्घटना घडली आहे. झाड पडून पुन्हा एकदा निष्पाप मुंबईकराला आपला प्राण गमवावा लागला आहे, कुर्ल्याच्या नौपाडा परिसरात सकाळच्या सुमारास झाडाची फांदी डोक्यात पडल्याने ६३ वर्षीय युनुस कुंदावाला यांचा दुर्दैवी मृत्य झाला आहे. चेंबूर येथे शाळेच्या स्कूलबसवरती झाड पडल्याने शाळकरी मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असताना पुन्हा एकदा झाड पडून मुंबईकरांचा जीव गेल्याने मुंबई महापालिकेच्या मान्सूनपुर्व तय्यारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे, चेंबूर येथे शाळेतील झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, कुर्ल्यातील या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व झाड छाटणीच्या दाव्यांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mumbai Tree Collapse : सुसाट वाऱ्यामुळे दुकानावर कोसळले झाड

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरातील बीएमसी शाळेजवळ असलेल्या 'गोम्स गाऊन बिल्डिंग' परिसरात ही दुर्घटना घडली. रविवारी दुपारच्या वेळी अचानक जोरदार वारे सुटल्याने येथील एक मोठे झाड अचानक शेजारील दुकानावर उन्मळून पडले. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवकांचे स्वीय सहाय्यक रोशन शिंदे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला दिली.

झाड कोसळले तेव्हा युनूस कुंदावाला हे दुकानातच हजर होते. झाडाचा प्रचंड ढिगारा दुकानावर पडल्याने ते त्यात गंभीररीत्या चिरडले गेले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्थीने त्यांना बाहेर काढून तातडीने जवळच्या 'फौझिया हॉस्पिटल'मध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, बेस्ट (BEST) कर्मचारी आणि पालिकेच्या वॉर्ड ऑफिसचे मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने दुकानावर पडलेले झाड कापून बाजूला केले. या दुर्घटनेमुळे परिसरातील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. बेस्ट प्रशासनाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Mumbai Tree Collapse : मनसैनिकांकडून रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन 

मनसैनिकांकडून रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे, कार्यकर्ते पोलिसांना भिडले आहेत. मनसैनिक आंदोलनावर ठाम आहेत. मनसेचे चांदिवलीचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्याकडून कुर्ल्याचा घटनेचा निषेध केला जात आहे. डोक्याचा काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला जातो आहे.

मुंबईतील कुर्ला परिसरात झाड कोसळून एका ६३ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या दुर्घटनेला ४ ते ५ तास उलटून गेले तरी महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी न फिरकल्यामुळे नागरिकांसह मनसेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. मनसेचे 'एल' वॉर्ड (चांद विभाग) अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी थेट दुर्घटनास्थळी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले असून, मुंबई महापालिकेच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

Mumbai Tree Collapse : मुंबईतील हा तिसरा बळी; पालिकेच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह

हा पाऊस आणि पालिकेच्या निष्काळजीपणाचा मुंबईतील गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बळी ठरला आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागल्याने कुर्ल्यात सध्या तीव्र संतापाची लाट आहे. मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही झाडे छाटणी का झाली नाही? आणि दुर्घटना घडूनही प्रशासन ढिम्म का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

Mumbai Tree Collapse : "मॅटर दाबायचा प्रयत्न करतायत..." मनसेचा गंभीर आरोप

आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना मनसेचे पदाधिकारी अत्यंत संतप्त पाहायला मिळाले. मनसे नेते म्हणाले, "इथे एका निष्पाप माणसाचा जीव गेला आहे, पण पालिका प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्घटना घडून चार तास झाले तरी अद्याप एकही अधिकारी फिरकलेला नाही. हे आम्ही खपवून घेणार नाही." मनसेने प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, आम्ही १५ मिनिटे वाट पाहू, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी, या मागणीसाठी मनसेचे हे आंदोलन सुरू आहे.

Mumbai Tree Collapse : मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरू

मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहेत. सायन, दादर, माहिम या परिसरात झाड कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता पुन्हा चेंबूर परिसरातील नॅशनल सरोदया शाळेच्या बाहेर झाडाची फांदी पडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण आहे. मागच्या आठवड्यात चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा शाळेच्या परिसरात झाडाची फांदी पडल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली जात आहे

Mumbai Tree Collapse : एका १८ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा झाडाची फांदी डोक्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे आणि त्यांच्या फांद्या कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचे सत्र दुर्दैवाने सुरूच आहे. अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना आरे कॉलनीमध्ये घडली असून, ४ जुलै २०२६ रोजी मुसळधार पाऊस सुरू असताना युनिट क्रमांक १३ च्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका १८ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा झाडाची फांदी डोक्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद असे या मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना ही नैसर्गिक आपत्ती ओढवली; फांदी कोसळल्याने तो जागीच बेशुद्ध झाला आणि त्याला तातडीने मालाड पूर्व येथील बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची (A.D.) नोंद केली आहे.

काल पवई हिरानंदनी आणि विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे झाड कोसळले होते, आज घाटकोपर येथे झाड कोसळल्याची घटना घडली. या सगळ्या घटना पाहता मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग पावसाळ्यापूर्वी नेमकी कसली तयारी करत होता, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Embed widget