एक्स्प्लोर

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची मर्यादित सेवा सुरु

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज 15 जून म्हणजे पहाटेपासून मध्य आणि पश्चिम मार्गावर ही लोकल सेवा सुरु करण्यात आली. दोन्ही रेल्वेकडून तब्बल 346 लोकल फेऱ्या केल्या जाणार आहेत.

मुंबई : राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून (15 जून) सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील.

सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही उपनगरीय सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे.

शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचं तिकीट मिळेल, तसंच प्रवास करता येईल.

मुंबईत जीवनावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली जावी यासाठी राज्य सरकार अनेक दिवसांपासून आग्रही होतं. यासंदर्भात काल (14 जून) एक महत्वाची बैठक रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आजपासून सुरु झालेल्या या उपनगरीय सेवेच्या फेऱ्यात कोणाकोणाला प्रवास करता येईल, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारलाच असणार आहे.

पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-डहाणू रोडवर उपनगरीय सेवा सुरु झाली आहे. या मार्गावर अप 73 आणि डाऊन 73 अशा, 12 डब्यांच्या 146 फेऱ्या चालवल्या चाणार आहेत. दर 15 मिनिटांच्या अंतराने धावणाऱ्या या बहुतांश उपनगरीय फेऱ्या विरार आणि बोरिवलीपर्यंत असतील तर उर्वरित डहाणू रोडपर्यंत जातील. पहाटे 5.30 पासून रात्री 11.30 पर्यंत लोकल धावतील.

रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 65 ट्रेन चर्चगेट ते विरार आणि 8 ट्रेन विरार ते डहाणू रोड मार्गावर धावतील. या ट्रेन चर्चगेट ते बोरिवली मार्गावर फास्ट असतील तर त्यापुढे स्लो होतील.

मध्य रेल्वेची लोकल सेवा सेंट्रल रेल्वे अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी 100 अशा 200 ट्रेन चालवणार आहे. सेंट्रल रेल्वेवरील ट्रेनही वेस्टर्नप्रमाणेच फास्ट ट्रेनच्याच थांब्यांवर थांबतील. या ट्रेन आधी सुरु असलेल्या रेल्वे कर्मचारी स्पेशल ट्रेन वगळून आहेत.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आणि ठाणे या मेनलाईनवर 130 उपनगरीय सेवा धावतील तर उर्वरित 70 सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावर धावतील .

सामान्य मुंबईकरांना प्रवेश नाही या ट्रेन सामान्य मुंबईकरांसाठी नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही सेवा असेल. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनच्या 50 हजार प्रवासांसह राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेतील एकूण 1.25 लाख कर्मचारी या ट्रेनमधून प्रवास करु शकणार आहेत.

प्रवाशांना ओळखपत्र आवश्यक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बुकिंग विंडोही सुरु केली जाणार आहे, तिथे ते आपलं सरकारी ओळखपत्र दाखवून तिकीट घेऊ शकतात. ओळखपत्राशिवाय स्टेशनच्या आत प्रवेश मिळणार नाही. स्टेशनजवळ पार्किंगची सुविधा मिळणार नाही तसंच फेरीवाल्यांनाही परवानगी नसेल.

रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकारी, चेकिंगद्वारे निश्चित करतील की अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणताही प्रवासी ट्रेनमध्ये उपस्थित नसेल.

ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग गरजेचं प्रत्येक ट्रेनची क्षमता 1200 प्रवाशांची असते, पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी एका ट्रेनमध्ये केवळ 700 प्रवाशांनाच परवानगी दिली जाईल. सोबतच संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क लावावा आणि हात सॅनिटाईज करावेत, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

Mumbai Local Train | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget