एक्स्प्लोर

SRA घरांची विक्री आता 5 वर्षांनंतर करता येणार, 10 वर्षांचा नियम रद्द, मुंबईकरांना होणार मोठा फायदा

SRA House In Mumbai : महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास विधेयक 2023 मंजूर करण्यात आलं असून त्या माध्यमातून आता सदनिकांची विक्री ही पाच वर्षांनंतर करता येणार आहे. 

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (SRA) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत. राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी 10 वर्षांनंतर विकण्याचा नियम होता. हा नियम बदलून 5 वर्षे करण्यात आला आहे. याबाबतचे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा,  निर्मूलन व पुनर्विकास ) (दुसरी सुधारणा) विधेयक 2023 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. 

एसआरएतील घरांच्या विक्रीबाबत कालावधी कमी करण्याची मागी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि अनेक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यावर आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 

राज्याचे मंत्री अतुल सावे म्हणाले, 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत एसआरएतील घरविक्री कालावधी 5 वर्ष करण्याचा  सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. आज दोन्ही सभागृहात याबाबतचे विधेयक संमत करण्यात आले.

राज्यातील आणि प्रामुख्याने मुंबईतील सुमारे 2.50 लक्ष सदनिका धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात सदनिका धारकांच्या आधार क्रमांकाचे संलग्नीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आळा बसेल अशी ही माहिती मंत्री सावे यांनी यावेळी दिली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Embed widget