एक्स्प्लोर

परदेशातून मुलगा मुंबईत परतला, घरात आईचा सांगाडा

फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे आशा यांनी आत्महत्या केली, किंवा त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या घरात कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही

मुंबई : आईकडे पाठ फिरवून परदेशात स्थायिक झालेल्या मुलाला मुंबईत परतल्यानंतर आईचा सांगाडा आढळला आहे. अंधेरी भागातल्या ओशिवरासारख्या उच्चभ्रू परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. ऋतुराज साहनी हे आयटी इंजिनिअर आहेत. नोकरीनिमित्त ते पत्नी आणि मुलासह अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. अंधेरीतल्या ओशिवारा भागातील बेल स्कॉट टॉवरच्या दहाव्या मजल्यावर साहनी कुटुंबाचा फ्लॅट आहे. घरात ऋतुराज यांच्या 63 वर्षीय मातोश्री आशा केदार साहनी एकट्याच राहायच्या. आपल्या आईला भेटण्यासाठी रविवारी ऋतुराज मुंबईत आले. बराच वेळ आईने दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दिसलेलं दृश्य भयावह होतं. आशा साहनी यांचा मृतदेह बेडवर कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना बोलावल्यानंतर आशा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे आशा यांनी आत्महत्या केली, किंवा त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या घरात कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. ऋतुराज यांनी आईचा सांभाळ करण्यासाठी कुठलाही केअर टेकर किंवा घरकामाला नोकर-चाकर ठेवला नव्हता. त्यामुळे आशा यांनाच सगळी कामं करावी लागत. धक्कादायक म्हणजे ऋतुराज आणि आशा यांच्यातील अखेरचं बोलणं मे 2016 मध्ये म्हणजे तब्बल सव्वा वर्षांपूर्वी झालं होतं. सोसायटीच्य वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार ऋतुराज गेल्या काही वर्षांत कधी मुंबईत फिरकले नाहीत. आशा साहनीही फारशा घराबाहेर पडत नसत. आशा यांचा मृत्यू नेमका कधी झाला, त्यांचा मृतदेह कुजला असताना इतर रहिवाशांना दुर्गंधी कशी आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आईला एकटं सोडून लाखो कमावणाऱ्यांवर गुन्हा का दाखल करु नये असा सवाल विचारला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget