Bharat Gogawale : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात, फ्री वेवर आठ गाड्या धडकल्या!
शिवसेना शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले ( Bharat Gogawale Accident) यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे. काही वेळापूर्वी मुंबईतील फ्री वेवर हा अपघात झाल्याची माहिती आहे.
Mumbai Bharat Gogawale Accident : शिवसेना शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले ( Bharat Gogawale Accident) यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे. काही वेळापूर्वी मुंबईतील फ्री वेवर हा अपघात झाल्याची माहिती आहे. मुंबईमधील घाटकोपर ते मंत्रालय दरम्यानच्या फ्री वेवर हा अपघात झाला आहे. गोगावले यांच्या कारला मुंबईतल्या फ्री वे ब्रीजवर वाडीबंदर जवळ अपघात झाला. फ्री वेवर आठ गाड्यांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. माहितीनुसार भरत गोगावले हे सकाळी मंत्रालयात निघाले असताना गाडीचा अपघात झाला. पुढे जाणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने वाहनांचा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर बोलताना भरत गोगावले यांनी म्हटलं की, आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. मात्र कुणालाही काहीही दुखापत झालेली नाही. कुणीही काळजी करु नका, आम्ही सगळे सुखरुप आहोत, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.
सकाळी गोगावले म्हणाले, 'कुणी कितीही लाज लज्जा काढू देत, आम्ही काही चुकीचं केलं नाही'
आज सकाळीच बोलताना गोगावले यांनी म्हटलं होतं की, कुणी कितीही लाज लज्जा काढू देत, आम्ही काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टात आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यांमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी उत्तर दिले होते.
2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवल्याने राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. मात्र, असंगाशी संग करत काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत अभद्र आघाडी केल्याची आठवण करून देत, आम्ही काही चुकीच केलं नाही त्यामुळे लाज वाटण्याचा संबध येत नाही असं भरत गोगावले यांनी म्हटलं होतं. बाळासाहेबांचं हिंदूत्व आम्ही सोडणार नाही असेही ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde यांचं विधानसभा उपाध्यक्षांसह राज्यपालांना पत्र, Bharat Gogawale शिवसेनेचं मुख्य प्रतोद
Bharat Gogawale Shiv Sena : आम्ही गळाभेटी करतोय पण ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली होती त्यांचं काय?