एक्स्प्लोर
आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा देशात दुसरा नंबर!

मुंबई: आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा देशात दुसरा क्रमांक लागला आहे. मात्र सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं मुंबईत तुलनेनं कमीच उभारली गेली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी सर्वसामान्यांची घरं उभारण्यात फारसा रस दाखवलेला नाही. देशात मुंबईपाठोपाठ आलिशान घरं उभारण्याच्या यादीत पुण्याचा क्रमांक आहे. तर पहिल्या क्रमांकावर बंगरुळचा क्रमांक आहे. मुंबईत वाजवी दरातील घरांची उभारणी करण्यात हात आखडता घेणाऱ्या बिल्डरांनी आलिशान घरांच्या निर्मितीत मात्र चांगलाच रस घेतल्याचं दिसून आलं आहे. आलिशान घरांच्या उभारणीत देशभरात मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ पुण्यानं स्थान पटकावले आहे. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई यासारख्या महानगरांत वाजवी दरातील घरांची बांधणी मोठ्या प्रमाणावर झालेली नाही, बिल्डरांनीही अशा घरांच्या उभारणीत फारसा रस दाखवलेला नाही. याउलट आलिशान घरांच्या उभारणीत मात्र या मंडळींनी स्वारस्य दाखवलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदीत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्राला पुढील तीन वर्षांत चांगले दिवस येण्याची चिन्हे असून या क्षेत्रात १३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. एकूणच देशभरात या क्षेत्राला उर्जितावस्था येईल, असे चित्र आहे.
आणखी वाचा























