एक्स्प्लोर

Mumbai School : मुंबईत 2 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु होणार, पालिकेकडून परिपत्रक जारी

Mumbai School Reopen : मुंबई पालिकेने 2 मार्चपासून सर्व शाळा आणि महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Mumbai School Reopen : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास दिली आहे. 2 मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व  शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासंदर्भात परिपत्रक बीएमसीकडून जारी करण्यात आले आहे.

परिपत्रकात पालिकेने म्हटले आहे की, सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात याव्यात.

मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही
विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल परंतु मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल.  कोविड 19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल, असं परिपत्रकात म्हटलं आहे.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती आवश्यक
पालिकेनं म्हटलं आहे की, विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100% असणे आवश्यक आहे. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या सामामध्ये मैदानी खेळ शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे. 

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; तीन घरांवर दरड पडली, NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; तीन घरांवर दरड पडली, NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget