एक्स्प्लोर

मुंबईला पावसाने झोडपलं, कुठे पाणी साचलं, कुठे बस अडकली

मालाड सबवेमध्येही पाणी भरल्यामुळे मंगळवारी रात्री बेस्ट बस पाण्यात अडकली होती. सबवे वर पाणी साचल्यामुळे ही बस थांबवण्यात आली होती. त्यानंतर पावसाचे पाणी वाढत गेल्याने बस अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाली.

मुंबई : मुंबईसह ठाणे-कल्याण आणि वसई-विरार परिसरांना मंगळवारपासून मुसळधार पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे लोकलसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईत मंगळवारी दुपारपासून सुरु झालेल्या पावसानं रात्री उसंत घेतली होती. मात्र पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईतल्या पावसामुळे हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे. त्याचप्रमाणे वांद्रे, अंधेरी भागातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मालाड सबवेमध्येही पाणी भरल्यामुळे मंगळवारी रात्री बेस्ट बस पाण्यात अडकली होती. सबवे वर पाणी साचल्यामुळे ही बस थांबवण्यात आली होती. त्यानंतर पावसाचे पाणी वाढत गेल्याने बस अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाली. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न फ्री वे वरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. त्याचप्रमाणे हाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत आहे. वांद्रे लिकिंग रोड, एसव्ही रोड, जेव्हीएलआर (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड)वर काही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती आहे. अंधेरी सबवे, दहिसर सबवे आणि खार सबवेत पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. अंधेरी स्टेशनजवळही पाणी साचलं आहे. मिलन सबवेत पाणी साचल्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. https://twitter.com/MumbaiPolice/status/910342876453842951 https://twitter.com/MumbaiPolice/status/910332296305053696 https://twitter.com/MumbaiPolice/status/910333009299046400 https://twitter.com/MumbaiPolice/status/910332938281132032 जोरदार पावसामुळे मुंबई मेट्रोपोलिटन क्षेत्र म्हणजेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार मधील सर्व शाळा- महाविद्यालयं बंद राहणार आहेत. मुंबईतील पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आज (20 सप्टेंबर) मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेज बंद राहणार आहेत.

सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व शाळा, कॉलेज आज बंद राहणार

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. आजची सुट्टी शाळा-कॉलेजच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमधून वळती केली जाणार आहे. वसई-विरारमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. विरारमध्ये विष्णु गोविंद इमारतीची भिंत कोसळली. विरार पश्चिमेला स्टेशन रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी साचल्यामुळे रिक्षा, दुकानंही बंद आहेत. येत्या 24 तासात मुंबईसह उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, कल्याण आणि वसई-विरार परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. अनेक ठिकाणी रात्रीपासून वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. मुंबईतील लोकल रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे मुंबईतल्या डबेवाल्यांची सेवाही आज बंद राहणार आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम, राज्यभरातही संततधार

पावसाची आकडेवारी (मंगळवारी सकाळी 8.30 ते बुधवारी सकाळी 5.30 पर्यंत) कुलाबा - 191.1 मिमी सांताक्रुज- 275.7 मिमी मुंबईतील भरती वेळ : दुपारी 12 वाजून 3 मिनिटं (4.54 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटं

चर्चगेटहून रात्री 10.56 ला सुटलेली लोकल पहाटे 5 वाजता विरारला

पश्चिम रेल्वेवर विरार, चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर मध्य रेल्वेची वाहतूकही 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बरवरील लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचं विमान लँडिंगवेळी चिखलात रुतलं

पश्चिम रेल्वेच्या बांद्रा टर्मिनसवरुन सुटणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील अनेक विमानांची उड्डाणंही रद्द झाली आहेत, तर 56 विमानं दुसऱ्या मार्गे वळवली आहेत. मुंबईत भांडुपमध्ये दरड कोसळून 2 जण जखमी झाले आहेत, तर आठ घरांचं नुकसान झालं आहे. भांडुपच्या खिंडी पाडा भागात काल रात्री दरड कोसळली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget