एक्स्प्लोर

Mumbai Rain Powai Lake: आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागला

Mumbai Rain Powai Lake overflow: मुंबईकर हे पिण्याच्या पाण्यासाठी तलावांवर अवलंबून असतात. त्यामुळे पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पावसाने पवई तलाव भरला.

Mumbai Rain news: राज्यभरात मान्सूनच्या पावसाने पुनरागमन केल्यानंतर मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. रविवारी रात्रीपासून मुंबई  आणि उपनगर परिसरात जोरदार  पाऊस सुरु आहे. मंगळवारी पावसाने (Rain Updates) थोडीशी विश्रांती घेतली असली तरी ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. या जोरदार पावसामुळे मुंबईतील पहिला तलाव भरला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अखत्यारितील प्रमुख कृत्रिम तलावांपैकी एक असणारा पवई तलाव (Powai Lake) आज सकाळी सुमारे सहा वाजता भरून वाहू लागला आहे. या तलावाची साठवण क्षमता 545 कोटी लिटर (5.45 अब्ज लिटर) आहे. येथील पाणी पिण्यायोग्य नसून मुख्यतः औद्योगिक उपयोगासाठी (MIDC) तसेच आरे दूध संकुलातील अन्य अपेय कारणांसाठी वापरले जाते. (Mumbai Heavy Rain)

गेल्या दोन दिवसांतील सततच्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या कॅचमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलावाची पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळे तो वाहू लागला आहे. सध्या तलावातील पाण्याची पातळी 195.10 फूट इतकी नोंदवण्यात आली आहे. ही मुंबईकरांच्यादृष्टीने दिलासादायक बाब आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे बहुतांश तलाव हे शहराच्या बाहेर आहेत. मात्र, मुंबई लगतच्या भागांमध्येही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या सर्व तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. परंतु, आता हे तलाव कधी भरणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.  जून आणि जुलै महिन्यातील पाऊस हा मुंबईकरांच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दोन महिन्यांमध्ये होणाऱ्या पावसामुळे शक्यतो मुंबईतील तलाव भरतात. हा पाणीसाठा वर्षभर मुंबईकरांना पुरतो. त्यामुळे पाऊस आल्यानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव कधी भरतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असात. (Mumbai News)

Mumbai weather updates: मुंबईत पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. यानंतर मंगळवारी दिवसभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. दिवसभर आणि रात्री पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. मात्र, बुधवारी मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई उपनगरातील मालाड , अंधेरी, मुलुंड आणि ठाणे शहरात पुढील तासाभरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता आता कितपत खरी ठरणार, हे बघावे लागेल. 

आणखी वाचा

उजनी धरणाने जून महिन्यातच ओलांडली पन्नाशी; धरणात जमा झालाय तब्बल 91 टीएमसी पाणीसाठा; यंदा महापूराची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
Mumbai Crime News: मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Embed widget