एक्स्प्लोर

मार्ग बंद, वीज गायब, तुफान पाऊस, दिवसभरात मुंबईत काय घडलं?

मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे.

मुंबई: मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईकरांची चहूबाजूंनी कोंडी झालीच आहे, त्यात आता बहुतेक ठिकाणची वीजही गेल्याने, मुंबईकर पुरते कासावीस झाले आहेत. मुंबईत गेल्या 6 तासात अनेक भागात तब्बल 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 30 हजार कर्मचारी कार्यालयात अडकले मुसळधार पावसामुळे ऑफिसमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला आहे. जवळपास 30 हजार जण कार्यालयांतच अडकले आहेत. अनेक ठिकाणी वीज गायब प्रचंड पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली असताना, आता रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत आहे. कारण मुंबईतील दादर, माहिम, परळ, लालबाग परिसरातील वीज गेली आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या तीनही मार्ग ठप्प झाले आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील ट्रॅकवर पाणी आलं आहे. मध्य रेल्वेवर तर पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही दिशेला लोकल सुटणार नाही, अशी अनाऊन्समेंट दुपारी झाली, त्यानंतर संध्याकाळपर्यंत एकही सूचना दिली नाही. तर हार्बर मार्गावर तर सीएसटीकडे निघालेली लोकल वाशीजवळ तासभर रखडली. त्यानंतर तीच लोकल पुन्हा मागे पनवेलला नेण्यात आली. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे स्टेशनवर पाणी आलंच शिवाय तांत्रिक बिघाडही झाला. त्यामुळे तीनही रेल्वे मार्ग बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी लोकल जिथल्या तिथे थांबल्यामुळे लोकांना लोकमधून उतरून कमरेपर्यंतच्या पाण्यात चालत यावं लागलं. अनेक किमीचं अंतर पाण्यातून पायी करावं लागलं. सायन, परळ आणि कुर्ला स्थानकांच्या रुळांवर पाणी साचलं आहे. रस्त्यांवर गुडघाभर पाणी मुंबईसह उपनगरांना धुवाधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईतील दादर, हिंदमाता, परळ, वरळी, जोगेश्वरी, अंधेरी, जेव्हीएलआर किंग सर्कल, वडाळा, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं. तर अनेक भागात झाडं पडल्यामुळे रस्ते वाहतूक रखडली आहे. केईएम रुग्णालयात पाणी मुंबईत पावसाचा जोर इतका वाढलाय की जागोजागी पाणी साचलंय. मुंबईतल्या केईएम रूग्णालयातदेखील पाणी शिरलंय. त्यामुळे पावसाचा फटका आता रूग्णांनी देखील बसतोय. रस्त्यावर गाड्या तरंगल्या सततच्या होणाऱ्या पावसानं मुंबईत जागोजागी पाणी साचलंय, लोकांची अक्षरश तारांबळ उडाली आहे… रस्त्यांवर बस आणि गाड्या अशरक्ष तरंगताना दिसतायत..त्यामुळे रस्ते वाहतुकीचेही तीनतेरी वाजलेत… विमानांची उड्डाणं रखडली रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसह मुंबईतील पावसाचा परिणाम विमानाच्या उड्डाणांवरही झाला. अनेक विमानांची उड्डाणं रखडली आहेत. तर संध्याकाळी सहानंतर काही विमानांचं उड्डाण झालं. मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा बंद पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्यानं मुंबईतल्या दुपारच्या सत्रातल्या शाळा बंद कऱण्यात आल्या. त्याचबरोबर दुपारनंतर स्कूलबस देखील धावल्या नाहीत. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. रस्ते तुंबल्यानंतर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडतात. वरळीत असाच प्रकार घडल्यानं काही काळ वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसात बाहेर फिरताना लोकांनाही खबरदारीचं आवाहन केलं गेलंय. गणेश मंडळांचा वीजपुरवठा खंडीत करा दरम्यान, गणेश मंडपाच्या आजूबाजूला किंवा परिसरात पाणी साचलं असेल, तर मंडळानं त्वरित वीजपुरवठा बंद करावा, असं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं केलंय. एनडीआएरएफच्या तुकड्या तयार पावसाचा जोर पाहता एऩडीआरएफच्या तीन तुकड्या रेडी ठेवण्यात आल्या आहेत. तसंच पुण्यातून दोन तुकड्या बोलावल्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी पुढील चार तासात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामानाच्या अंदाजानंतर मंत्रालय आणि मुंबईतील सरकारी कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी मोदींचं मदतीचं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचित केली. मुंबई आणि परिसरात अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला लागेल ती, सर्वतोपरी मदत करण्याची हमी केंद्र सरकार देतं. मुंबई आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित राहावं. जोरदार पावसात आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करतो, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांचं आवाहन दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने आपत्ती निवारण कक्षात धाव घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांशी बातचित करुन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. बुधवारी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी दरम्यान आजच्या तुफान पावसामुळे मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मुंबईतील पावसाची आकडेवारी – परिसर- गेले 24 तास/ गेला एक तास
  • अंधेरी – 270 मिमी/ 92 मिमी
  • बीकेसी – 204 मिमी/ 54 मिमी
  • वांद्रे पश्चिम – 247 मिमी/ 52 मिमी
  • भांडुप – 251 मिमी/ 58 मिमी
  • चेंबुर – 214 मिमी/ 62 मिमी
  • कफ परेड – 123 मिमी/ 10 मिमी
  • दहिसर – 190 मिमी/ 40 मिमी
  • घाटकोपर पूर्व – 221 मिमी/ 61 मिमी
  • गोरेगाव – 193 मिमी/ 65 मिमी
  • परळ – 285 मिमी/ 40 मिमी
  • कुर्ला – 300 मिमी/ 92 मिमी
संबंधित बातम्या LIVE : दादर, सायन, परळ भागात वीजपुरवठा खंडित LIVE- मुंबईत पावसाचा जोर वाढला   स्टेशनवर अडकला आहात? मुंबईतील या मार्गांवर बेस्टकडून अतिरिक्त बस  मुंबईत गेल्या एका तासात कुठे किती पाऊस? विभागनिहाय आकडेवारी  पाऊस अपडेट : राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी?  दादरच्या फूलमार्केटमध्ये पाणीच पाणी, गुडघाभर पाण्यात फुलं आणि हार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाDevendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget