एक्स्प्लोर

Mumbai Rain : मुंबईचा पाऊस आणि हिंदमाता... पाणी साचण्याची परंपरा कायम, कित्येक वर्षापासूनची समस्या कायम

मुंबईत पाऊस(Mumbai Rain) सुरु झाला की एक ठिकाण मीडियामध्ये चर्चेत असतं. त्या ठिकाणाचं नाव म्हणजे हिंदमाता. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाळ्यात नेहमी पाणी साचतं त्यापैकी हिंदमाताही एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदमाताला पाणी साचण्याची परंपरा कायम आहे

मुंबई : मुंबईत (Mumbai Rain)गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (heavy rain) सुरु आहे.  मुंबईत पाऊस सुरु झाला की एक ठिकाण मीडियामध्ये चर्चेत असतं. त्या ठिकाणाचं नाव म्हणजे हिंदमाता. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाळ्यात नेहमी पाणी साचतं त्यापैकी हिंदमाताही एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदमाताला पाणी साचण्याची परंपरा कायम आहे. इतक्या वर्षांत मुंबई बदलली पण हिंदमाताचं पाणी साचण्याचं जंक्शन बदललं नाही. 

गेल्या दोन दशकांत मुंबईत 50 हून अधिक पुल बांधले गेले. मेट्रो आणि मोनोरेल चालू  झाल्या. वांद्रे-वरळी सी लिंक बनला. इस्टर्न फ्रीवे बनला. काही लोकल गाड्या वातानुकूलित झाल्या. सिंगल स्क्रीन सिनेमांची जागा मल्टिप्लेक्सने घेतली.  एकूणच मुंबईचे स्वरूप बर्‍याच प्रमाणात बदलले पण मुंबईतील ज्या जागेच चित्र बदलले नाही ते आहे हिंदमाता. गेल्या दोन दशकातील कोणत्याही वर्षाच्या पावसाळ्याची छायाचित्रे पाहा. या ठिकाणचे रस्ते नदीत बदललेले दिसतील आणि लोकांचा दर पावसाळ्याचा संघर्ष अजून ही सुरु आहे. 

मुंबईसाठी हिंदमाता जंक्शनचे महत्त्व आहे. कारण याच जंक्शनपासून दक्षिण व मध्य मुंबईला उपनगराला जोडणारा रस्ता जातो. हा रस्ता इस्टर्न एक्सप्रेस हायवे, मुंबई नाशिक हायवे आणि त्यानंतर मुंबई आग्रा हायवे बनतो. हिंदमाता जंक्शनवर पाणी भरणे म्हणजे या सर्व रस्त्यांवरच ट्राफिक ठप्प होणे. 
 
या जंक्शनला हिंदमाता असे नाव देण्यात आले कारण तेथे हिंद माता मंदिर आहे. 1984 पर्यंत इथे हिंदमाता नावाचा सिनेमा हॉल असायचा जिथे मराठी चित्रपटांचं चित्रीकरण व्हायचं. जवळपास रहाणारे गिरणी कामगार येथे चित्रपट पहायला येत असत. येथे पाणी भरण्याचे मुख्य कारण म्हणजे हे परिसर शहराच्या सखल भागात येतो. परिसराचे भौगोलिक स्वरुप बशीसारखे आहे, त्यामुळे आजूबाजूचे पाणीही येथे साचते. येथून 5 किमी अंतरावर रे रोडवर बीएमसीचे सर्वात जवळचे पंपिंग स्टेशन आहे. मुंबई भौगोलिकदृष्ट्या कोकणचा एक भाग आहे आणि कोकण हा देशातील पर्जन्यमान क्षेत्रांपैकी एक आहे. हेच कारण आहे की बीएमसीचे सर्व प्रयत्न करूनही हिंदमातामध्ये पाणी भरले जाते

दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी बीएमसीच्या तयारी बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातात परंतु असे नाही की बीएमसीने हिंदमाताचा प्रश्न सोडविण्यासाठी काही केले नाही. वर्ष 2019 मध्ये, बीएमसीने येथे एक बोगदा तयार केला ज्याची खोली 6 मीटर आणि रुंदी 2.2 मीटर आहे. आता बीएमसीने परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन 130 कोटी खर्च करून येथे भूमिगत पाण्याची टाकी बनविली ज्याची लांबी 6  मीटर, 50 मीटर रुंदी आणि 6 मीटर खोल आहे. ही टाकी 30 लाख लिटर पाणी साठवू शकते.  

हिंदमातामध्ये पाणी भरल्याची छायाचित्रे आजही पूर्वीसारखीच आहेत, परंतु येथेही सकारात्मक बदलही झाले आहेत. 9 जून रोजी हिंदमातामध्ये पाणी साचल्यानंतरही या रस्त्यावरील वाहतूक थांबली नाही, कारण बीएमसीकडून हिंदमाता आणि परळ मधल्या रस्त्याची उंची वाढविण्यात आली होती. त्यामुळे पहिल्यांदा  वाहतुकीवर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही. आपल्या नैसर्गिक संरचनेमुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय होते. अश्या परिस्थितीत उशिरा का होईना यातून धडा घेत हिंदमातासाठी केलेले प्रयत्न जर शहरातील इतर भागातही केले गेले तर मुंबईकरांची वेदना थोडी कमी होऊ शकेल.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget