(Source: Poll of Polls)
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला; तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरु, पाहा Latest Updates
Mumabi Rain Local Train Updates: मुंबई आणि मुंबई उपनगरसह, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे.
Mumabi Rain Local Train Updates मुंबई: मुंबई आणि मुंबई उपनगरसह, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. मुंबईतसह उपनगरात काल (8 जून) रोजी पावसामुळे दाणादाण उडाली होती. यामुळे रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुक देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच सध्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे सेवा वेळेवर सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
हार्बर रेल्वेही सुरळीत सुरु-
पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक 4.30 वाजता कार्यान्वित करण्यात आला. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकापेक्षा 2-3 मिनिटे उशिरा धावत आहेत आणि हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
#HarbourLine#CentralRailway#MumbaiRains
— Dr Swapnil Nila (@swapnil_IRTS) July 9, 2024
Local update
Harbour line track was operationalised at 4.30 after water receded.
Main Line both fast and slow locals are running 2-3 min behind schedule and harbour line locals are running almost on time now.
ठाण्यातही पावसाची विश्रांती-
मुसळधार पावसानंतर मध्यरात्रीपासूनच ठाणे शहरात पावसाची विश्रांती घेतली आहे. मागील 20 तासात ठाणे शहरात सुमारे 89.89 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात बारावीपर्यंतच्या सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून पावसाच्या विश्रांतीनंतर ठाणेकरांचा रस्ते वाहतूक व रेल्वे वाहतुकीचा प्रवास सुखकर होणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरळीत सुरु असून सध्या 2 ते 5 मिनिट उशिराने धावत आहे.
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन-
हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली. आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे. अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा. भारतीय हवामान खात्याने मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.
अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
भारतीय हवामान विभागाकडून सातारा आणि पुणे जिल्ह्याला 9 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज (दि.9) रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.