एक्स्प्लोर

मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल वाहतूक पूर्वपदावर

मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी बरसत होत्या. मुंबईत सोमवारी सकाळपर्यंत मागील 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.  मुंबई उपनगरांसोबत ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पाऊस झाला. रविवारी दिवसभर मुंबईत जोरदार पाऊस झाला.

LIVE UPDATE

मध्य आणि हार्बर मार्गावर ट्रॅकवरील पाण्याचा निचरा, वाहतूक सुरु पण उशिराने

नालासोपारा-विरार डाऊन आणि नालासोपारा-विरार अप मार्गावरील वाहतूक पूर्ववत

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे स्टेशनवर तांत्रिक बिघाड, पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने ठाण्याहून वाशीला जाणारी सेवा विस्कळीत

मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र 2 आणि 4 च्या प्रात्यक्षिक परीक्षेला जे विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचू शकले नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा होणार, तर एमए समाजशास्त्र सत्र 3 ची दुपारची लेखी परीक्षा पुढे ढकलली. याचं वेळापत्रक लवकरच जाहीर होईल

मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तांत्रिक बिघाड, लोकल खोळंबल्या

वसईच्या मिठागर भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरु, एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाची दखल

सँडहर्स्ट रेल्वे ट्रॅकवरील कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा हटवला, धीम्या मार्गावरील वाहतूक  सुरु, महापालिका, रेल्वे, म्हाडाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

पावसाची स्थिती पाहता, मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, शालेय शिक्षणमंत्री तावडे यांची घोषणा

लोकल ट्रेन अपडेट (10.51 am) - मुंब्रा, कळवा, ठाणे इथे पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तास उशिराने - नालासोपारा इथे ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूकही अर्धा तास उशिराने, नालासोपाराच्या आधी एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या - सँडहर्स्ट रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर भिंत कोसळली, धीमी वाहतूक जलद मार्गावरुन वळवली - हार्बर मार्गावर पाणी साचलेलं नाही, परंतु वाहतूक 20 मिनिटं उशिराने

मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल वाहतूक पूर्वपदावर

कळव्यातील शाळेत नाल्याचं पाणी शिरलं ठाणे : कळव्यातील सह्याद्री शाळेत नाल्याचं पाणी शिरलं. दत्तवाडी आणि शाळेचा परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी असलेल्या नाल्याचं पाणी बाहेर आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी कळवा नाक्यावरुन खारेगावपर्यंची दोन्ही दिशेची वाहतूक काही प्रमाणात मंदावली आहे.

रायगड : जुन्या मुबंई-पुणे हायवेवर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत, खोपोलीजवळ झाड पडल्याने दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद

मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल वाहतूक पूर्वपदावर

मुंबई : लोकल ट्रेनच्या हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट स्टेशनच्या स्लो ट्रॅकवर भिंत कोसळली, धीमी वाहतूक जलद मार्गावरुन वळवली

वसई - वसई पूर्वेकडील मिठागरात पाणी, 400 लोक अडकल्याची माहिती, प्रशासनाचे कोणतेच अधिकारी इथे पोहोचलेले नाहीत

वसई- विरार परिसरात जोरदार पाऊस, रात्रभर पावसाची संततधार, अनेक सखल भागात पाणी साचले वसई- विरार परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. रात्रभर पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. वसईचा नवघर डेपो, सनटी रोड पाण्याखाली गेला आहे. तर नालासोपारातील आचोळे, तुलीज, टाकी रोड, नालासोपारा स्टेशन परिसर जलमय झाला आहे. तर विरारच्या विवा कॉलेज परिसरातही पाणी साचले आहे. कोकणात मुसळधार कुडाळमधल्या कर्ली नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातही आंबोली, मांगेली, सावडाव आणि नापणे अशा धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केली. सध्या पावसाचा जोर वाढत असल्यानं पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल वाहतूक पूर्वपदावर मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल औरंगाबादेत काही तास पाऊस झाला. गेल्या आठवडाभरापासून कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. मात्र मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानं बळीराजा चांगलाच सुखावला आहे. कृष्णेच्या बंधाऱ्यावरुन पाणी पावसाच्या जोरामुळे सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सांगलीत पावसानं चांगलाच जोर धरला. कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असून बंधाऱ्यावरुन पाणी वाहू लागलं आहे. यामुळे प्रशासनाने जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल वाहतूक पूर्वपदावर रायगडात तरुण बुडाला रायगडमध्ये तलावात तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. उरण तालुक्यातील विनायक गावचा रहिवासी विराज पाटीलचा मृत्यू झाला. केगावमधील तलावात तीन ते चार मित्र पोहायला गेले असताना ही घटना घडली. स्थानिक गावकऱ्यांच्या सहाय्यानं विराजचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget