एक्स्प्लोर
स्टेशनवर अडकला आहात? मुंबईतील या मार्गांवर बेस्टकडून अतिरिक्त बस
मुंबईतील लोकल सेवा रखडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे बेस्टने काही महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त बस सोडल्या आहेत.
मुंबई : मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
लोकल रखडल्यामुळे ऑफिसहून घरी जाणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनाही वाहतूक सुविधा नसल्याने अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. त्यासाठी बेस्टने काही महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त बस सोडल्या आहेत.
रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट केल्याचं स्टेशनबाहेर दिसून येत आहे. तर रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूकही धीम्या गतीने आहे. प्रवाशांना खाजगी वाहतूक सेवेऐवजी आता बेस्टच्या बसचा चांगला पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
लोकल वाहतूक ठप्प, बेस्टकडून या मार्गांवर अतिरिक्त बस
सायन ते मुलुंड चेकनाका - बस क्रमांक 302 - 10 बस
बॅकबे ते सांताक्रुझ - बस क्रमांक 83 - 12 बस
वडाळा ते सीएसएमटी - बस क्रमांक 10 - 2 बस
देवनार ते सीएसएमटी - बस क्रमांक C50 - 2 बस
मुंबई सेंट्रल ते टाटा पॉवर - बस क्रमांक 351 - 3 बस
हुतात्मा चौक ते अंधेरी - बस क्रमांक 84 - 2 बस
सांताक्रुझ - बस क्रमांक 28 - 2 बस
आणिक आगार ते सीएसएमटी - बस क्रमांक C6 - 4 बस
तिन्हीही लोकल मार्ग ठप्प
ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मुंबईतील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर लाईन आणि पश्चिम रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्टेशनमध्ये अनेक प्रवासी खोळंबलेले आहेत. तर काही लोकल स्टेशनांच्या मध्येच थांबल्याने प्रवाशांना उतरून रस्ते वाहतुकीचा पर्याय शोधावा लागत आहे.
संबंधित बातम्या :
LIVE- मुंबईत पावसाचा जोर वाढला
मुंबईत ‘पाऊस’फुल्ल, ‘या’ रस्त्यांवरुन जाणं टाळा
LIVE : पुढील चार तासात पावसाचा जोर पुन्हा वाढणार – हवामान विभाग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement