Mumbai Railway Police : मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक, आयुक्तांनी मुंबईकरांना माहिती दिली
Mumbai Railway Police : रेल्वे पोलीस आयुक्तांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका
Mumbai Railway Police : मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account Hcaked) अचानक हॅक झाले आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. त्यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्वीट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, याबाबत लवकरच अधिक माहिती दिली जाईल. या प्रकरणी तपास यंत्रणा सज्ज झाल्या असून अकाउंट लवकरात लवकर पूर्ववत केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
प्रिय मुंबईकर,
— CP GRP Mumbai (@cpgrpmumbai) October 28, 2022
.@grpmumbai हे खाते 'हॅक' झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया या खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष देऊ नका. खात्याचा ताबा परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तोपर्यंत आपण आपले प्रश्न व तक्रारी @cpgrpmumbai अथवा '१५१२' वर कळवू शकता.
सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ
गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हॅकर्स ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला टार्गेट करत आहेत. अनेकदा सरकारी ट्विटर अकाउंट हॅक करण्याचे प्रकार घडतात. हे थांबवण्यासाठी भारतात सर्व तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तसेच या विरोधात कडक यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ट्विटर, फेसबुक अकाउंट हॅक करून आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यासाठी तपास यंत्रणा सज्ज असून सातत्याने या प्रकारच्या हल्ल्यांविरोधात कारवाई करण्यात येते.