एक्स्प्लोर
Advertisement
रक्षाबंधननिमित्त आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
मेगाब्लॉक दरम्यान अनेक लोकल फेऱ्या रद्द होतात. तर काही उशीराने धावतात म्हणूनच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केला आहे.
मुंबई : मुंबईत आज रविवारी 26 ऑगस्ट रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रक्षाबंधननिमित्त मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रक्षाबंधनच्या दिवशी लोकल गाड्यांना खूप गर्दी असते म्हणूनच आज पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल (२५ ऑगस्ट) मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर वसई ते विरारदरम्यान ब्लॉक घेण्यात आल्याचे रेल्वेने सागितले . ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक बाबींची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी हा ब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक मध्यरात्री 12.30 पासून सकाळी 4.30 पर्यंत चालवला गेला.
मेगाब्लॉक दरम्यान अनेक लोकल फेऱ्या रद्द होतात. तर काही उशीराने धावतात म्हणूनच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement