एक्स्प्लोर

वर्दी घालून वाहतुकीच्या नियमांची ऐशी की तैशी, पोलीस उपनिरीक्षकाची मुजोरी कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

हेल्मेट न वापरल्याबद्दल, सिग्नल मोडल्याबद्दल ई-चलन पाठवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या गैरवर्तनाबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना त्याच्या वरिष्ठांना दिल्याचं बोललं जातं आहे.

मुंबई : सामान्य नागरिकांना नियम तोडण्यावरून पोलिसांकडून दंड आकारला जातो. मात्र पोलिसच जर नियम तोडत असतील तर काय करायचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  मुंबई पोलीस उपनिरीक्षकाला 'हेल्मट कुठे आहे, सिग्नल का तोडलात?', असे विचारल्यास 'तू कोण आहेस?, तुला जाब विचारण्याचा अधिकार नाही, निघ इथून, मी सिग्नल मोडेन, लोकांना उडवेन, तू कोण मला विचारणारा?', अशा उर्मट पद्धतीने पोलिसानं उत्तर दिल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच गाजतोय. गणवेश घालून वाहतुकीचे नियम मोडणं मुंबई पोलिसांतील या पोलीस उपनिरीक्षकाला चांगलंच महागात पडलंय. मुंबई गोरेगाव परिसरात शुक्रवारी चक्क एका पोलिसानेच वाहतुकीचे नियम मोडले आणि त्याबद्दल एका सर्वसामान्य बाईकस्वारानं विचारणा केली असता त्या पोलीसानं उर्मटपणे अरेरावी करण्यास सुरूवात केली. मात्र हा सगळा प्रकार त्या बाईकस्वारानं हेल्मेटवर लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. या पोलीस उपनिरीक्षकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आणि हा पोलीस अधिकारी गोत्यात आला. संबंधित पोलिस उपनिरीक्षकाविरोधात विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी सारखेच, त्यामुळे त्यांचं काटेकोरपणे पालन हे व्हायलाय हवं, अशा स्पष्ट सूचना पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिसांना दिल्या आहेत. मात्र संबंधित पोलीस उपनिरीक्षक विना हेल्मेट मोटरसायकल चालवत होता. इतकंच नव्हे तर तो दुचाकी चालवताना मोबाईलवरही बोलत होता. याही पुढे जाऊन त्यानं सर्रासपणे सिग्नलही तोडले. हा उपनिरीक्षक मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागात कार्यरत आहे. हेल्मेट न वापरल्याबद्दल, सिग्नल मोडल्याबद्दल ई-चलन पाठवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या गैरवर्तनाबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना त्याच्या वरिष्ठांना दिल्याचं बोललं जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget