मुंबईतील 28 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्याशी सलगी असणारे अधिकारी साईड पोस्टिंगवरुन पुन्हा मुंबईत
Mumbai Police Transfer: मुंबईतील पोलिस उपायुक्त स्तरावरील 28 पोलिसांच्या आज बदल्यांचे आदेश निघाले आहेत. जे अधिकारी या आधी नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते, त्यांना नियुक्तीचे नवे ठिकाण देण्यात आले आहे.
मुंबई: बृहन्मुंबई उपनगरीय पोलिस अधिक्षक, पोलिस उपायुक्त स्तरावरील 28 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण 28 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत. काही अधिकारी नियु्क्तीच्या प्रतिक्षेत होते, त्यांना आता त्यांच्या नियुक्तीच्या नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मविआ सरकारच्या काळात ज्यांना मुंबईबाहेरची साईड पोस्टिंग देण्यात आली होती, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे. अकबर पठाण यांची बदली नाशिकमधून मुंबई परिमंडळ 3 या ठिकाणी करण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांच्याशी सलगील असणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमध्ये पोलिस उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज या अधिकाऱ्यांचीदेखील नावे होती.
मविआ सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर साईड पोस्टिंग केली होती. तर मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र यापैकी एका गुन्ह्यात नाव आल्याने काही अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यानंतर मणेरे, पठाण आणि देवराज हे तिघे अधिकारी एकदम भूमिगत झाले.
आता कुठेही त्यांच्या नावाची चर्चा नसताना राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच या तिन्ही अधिकाऱ्यांच्या पंखांना पुन्हा बळ देण्यात आलं. रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट दिल्यानंतर सरकारने त्यांच्यावर कारवाई करणं तर बाजूलाच राहिलं, उलट या अधिकाऱ्यांची मुंबईत बदली करून त्यांच्यावर कृपादृष्टी दाखविली अशीच चर्चा पोलिस वतुर्ळात रंगली आहे. यांच्यामुळे खालचे अधिकारी लटकल्याचं चित्र आहे. पण उपायुक्त दर्जाचे मणेरे, पठाण आणि देवराज यांना पुन्हा चांगल्या पोस्टिंगवर नियुक्ती करण्यात आली. हे म्हणजे एकप्रकारे खालच्या अधिकाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांच्या बदल्या खालीलप्रमाणे,
कृष्णकांत उपाध्यय | गुन्हे शाखा |
बालासिंह राजपूत | सायबर गुन्हे |
प्रशांत कदम | गुन्हे शाखा |
राजू भुजबळ | वाहतूक पूर्व उपनगरे |
विनायक ढाकणे | सशस्त्र पोलिस नायगाव |
हेमराज राजपूत | परिमंडळ 6 |
संजय लाटकर | बंदर परिमंडळ |
डी एस स्वामी | गुन्हे शाखा अंमलबजावणी |
प्रकाश जाधव | अमली पदार्थ विरोधी कक्ष |
प्रज्ञा जेडगे | सशस्त्र पोलिस ताडदेव |
योगेशकुमार गुप्ता | जलद प्रतिसाद पथक |
शाम घुगे | सुरक्षा |
नितीन पवार | सशस्त्र पोलिस कोळे कल्याण कलिना |
अभिनव देशमुख | परिमंडळ 2 |
अनिल पारसकर | परिमंडळ 9 |
एम राजकुमार | मुख्यालय 1 |
मनोज पाटील | परिमंडळ 5 |
गौरव सिंह | वाहतूक दक्षिण |
तेजस्वी सातपूते | मुख्यालय 2 |
प्रविण मुंढे | परिमंडळ 4 |
दिक्षीतकुमार गेडाम | परिमंडळ 8 |
मंगेश शिंदे | वाहतूक पश्चिम उपनगरे |
अजयकुमार बन्सल | परिमंडळ 11 |
मोहित कुमार गर्ग | गुन्हे शाखा |
पुरुषोत्तम कराड | परिमंडळ 7 |
अकबर पठाण | परिमंडळ 3 |