एक्स्प्लोर
Coronavirus : मुंबईसह उपनगरांतील पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा, डान्सबार बंदीचे आदेश
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून नागरिकांची एकाठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबई : कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. रोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत, तर संशयित रुग्णांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी खबरदारी घेण्यास सरुवात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून नागरिकांची एकाठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनाही सावधगिरीच्या सूचना
कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोणावर अद्याप उपचार सापडलेला नसून यापासून सावध राहणे आणि काळजी घेणे हाच एक पर्याय आहे.
काही ऑफिसेसने वर्क फ्रॉम होम कल्चर वापरले आहेत. तर शाळांना आणि महाविद्यालयांना शासनाकडून सुट्या जाहीर करण्यात आले आहेत. तसेच मॉल,स्विमिंग पूल,इत्यादी सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात कमी येणं आणि स्वछता राखणं हाच पर्याय आहे आणि म्हणून याची दक्षता आता पोलिस विभागाने सुद्धा घेतली आहे.
मुंबईच्या कुरार येथे तक्रार करणार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छता राखावी यासाठी हॅन्ड वॉश, सेनेटायझर, आत मध्ये आल्यानंतर नागरिकांना सुद्धा मास्क मुंबई पोलिसांकडून देण्यात येत आहे जेणेकरून नागरिकांची आणि मुंबई पोलिसांची सुरक्षा यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये..
जगामध्ये याचा प्रसार वाढत असून मुंबईमध्येही आता विविध उपाययोजना या व्हायरसचा रोखण्यासाठी केल्या जात आहेत प्रत्येक जण आपल्या परीने सावधपणा बाळगत आहे तर मुंबई पोलीसही एक पाऊल पुढे सरसावून या व्हायरसची दोन हात करण्यास तयार झालेले आहेत.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनासुद्धा वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी नागरिकांनी सोबत स्वतःची काळजी घ्यावी आणि या व्हायरसपासून स्वतःलासुद्धा सुरक्षित ठेवावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी.
Drunk & Drive Order Cancelled | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अँड ड्राइव्हवरील कारवाई रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement