Mahim Dargah : मुंबई पोलिसांनी माहीम दर्ग्याला चादर चढवली, दर्ग्याच्या उत्सवाला सुरूवात, जाणून घ्या इतिहास
Mahim Dargah : माहीमच्या मखदूम शाह बाबा (Makhdoom Ali Mahimi) दर्ग्याचा उरुस गेली अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.
मुंबई: माहिमी दर्ग्याच्या (Mahim Dargah) उरूसाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांकडून मखदूम शाह बाबाच्या (Makhdoom Shah Baba Mahim) दर्ग्यावर उरुसाची पहीली चादर चढवण्याचा मान पूर्ण करण्यात आला. दरवर्षी 27 डिसेंबर ते पुढचे दहा दिवस हे साजरा होणारा माहीमच्या हजरत पीर मखदुम शाह बाबा दर्ग्याचा उरुस आणि माहीम मेळा यंदाही उत्सहात साजरा केला जातोय. उरुसाच्या 10 दिवसांत देशभरातून जवळपास 500 हून अधिक मानाच्या चादर दर्ग्यात येत असतात, त्यात मुंबई पोलीस हे चादर चढवतात हे सर्वाचं आकर्षण आहे.
माहीमच्या मखदूम शाह बाबा (Makhdoom Ali Mahimi) दर्ग्याचा उरुस गेली अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर लागणारे जायंट व्हील हे या माहीम मेळाचा मुख्य आकर्षण असतं. तसंच समुद्र किनाऱ्यावर मोठी जत्रा भरते आणि सगळीकडे उत्साह आणि उत्सवाचं वातावरण असतं.
मुंबई पोलिसांना चादर चढवण्याचा मान (Mumbai Police At Mahim Dargah)
पीर मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर उरुसाची पहिली चादर चढवण्याचा मान मुंबई पोलिसांचा आहे. आज ज्या ठिकाणी माहीम पोलिस स्टेशन उभं आहे, तिथंच पीर मखदुमशाह बाबा यांची बैठक होती असा इतिहास आहे असं सांगितलं जातं. 1923 मध्ये माहीम पोलीस ठाणे स्थापन झाले होते आणि त्यामुळं 100 वर्षांहून जास्त काळ ही परंपरा चालत आली आहे. माहीम पोलीस स्टेशनमधून दरवर्षी वाजत गाजत मुंबई पोलीस बाबांची चादर घेऊन संपूर्ण माहीमला फेरी मारुन बाबांच्या दर्ग्यात चादर चढवतात. यावेळी मुंबई पोलिसांचे बँड पथकही सहभागी होऊनन आपली सलामी दर्शवतात.
काय आहे इतिहास? (Mumbai Mahim Dargah History)
माहीम दर्ग्यामध्ये मुंबई पोलिसांना चादर चढवण्याचा पहिला मान आहे. त्यामागे वेगवेगळी मतं आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की बाबा मकदूम शाह हे पोलिसांच्या खूप जवळचे होते आणि अनेकदा गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना मदत करत होते. काही लोक म्हणतात की बाबांच्या शेवटच्या क्षणी एका पोलिसाने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. काही लोकांचे म्हणणे आहे की, मुंबईत दंगल झाली तेव्हा तत्कालीन पोलीस आयुक्तांनी येथे येऊन जातीय सलोख्याची प्रार्थना केली आणि काही तासांतच दंगल संपली.
ही बातमी वाचा: