एक्स्प्लोर

Mumbai Police formed SIT : ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार, SIT स्थापन

Mumbai Police form SIT : ईडीचे अज्ञात अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याच्या आरोपांचा तपास, आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापन

Mumbai Police form SIT : ईडीचे (ED) अज्ञात अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याच्या आरोपांचा तपास करण्यासाठी आता SIT स्थापन करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीचं नेतृत्व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू तपासाचे नेतृत्त्व करणार आहे. त्यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आणि ईडी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच संजय राऊतांनी जितेंद्र नवलानी यांच्यावरही आरोप केले होते. तेदेखील खंडणी वसुलीच्या कटात सहभागी असल्याचं सांगितलं होतं. यापूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या EOW विंगकडून केला जात होता. त्यावेळी EOW ने 7 लोकांचे जबाब नोंदवले होते आणि ज्या कंपन्यांच्या खात्यातील पैसे कथितरित्या गेले होते, त्या कंपन्यांशी संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

संजय राऊतांचे आरोप काय? 

मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालयं ही खंडणीखोर बनली असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्राला कसे लुटले, कोट्यवधींची अफरातफर केली याची सगळी माहिती उघड करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. कुणाला आमच्या आंगावर यायचं असेल त्यांनी जरूर यावं. एक दिवस त्यांना या ठिकाणाहून तोंड काळं करून जावं लागेल. आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक ईडी ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. तसेच, लवकरच ईडीचा सर्वात मोठा घोटाळा याचं ठिकाणी बसून बाहेर काढणार आहोत, असंही त्यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं होतं. गुन्हेगारीचे हे सिंडिकेट उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

जितेंद्र नवलानी यांच्यावर काय केले होते आरोप?

"जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचं रॅकेट चालवतो. हा ईडीचा वरिष्ठ अधिकारी आहे. यांनी 100 पेक्षा जास्त बांधकाम व्यवसायिकांकडून खंडणी घेतली आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावेळी संजय राऊत यांनी ईडीकडून महाराष्ट्रात झालेल्या कारवाईचे दाखले दिले होते. 

संजय राऊत म्हणाले होते की, "ईडीनं दिवान हाऊसिंग फायनान्सचा तपास सुरू केला. अचानक दिवानकडून या अधिकाऱ्यांच्या नावावर 25 कोटी ट्रान्सफर केले. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांचा तपास सुरू झाला की, नवनालीच्या सात कंपन्यामध्ये संबंधीत कंपनीकडून करोडो रूपये ट्रान्सफर केले जातात. नवलानी कोण आहे? त्यांचा किरट सोमय्याशी काय संबंध आहे? जे ईडीचे प्रमुख अधिकारी आहेत" असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. हे सर्व पैसे दिल्ली मुंबईत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी ट्रान्सफर केले जात आहेत. या पैशातून परदेशात संपत्ती खरेदी केली जाते. यात महाराष्ट्र भाजपच्या काही नेत्यांचा समावेश आहे, असा घणाघाती आरोपही संजय राऊत यांनी केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget