एक्स्प्लोर

Drugs : मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधी मोठी कारवाई; तीन कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त 

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपीकडून 225 ग्रॅम कोकेन, 1 किलो 500 मॅफेड्रोन, 335 ग्रॅम एमडीएमए जप्त केलं आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज आणि ड्रग्ज विक्रेत्यांच्या विरोधात कारवायांमध्ये आता वाढ झाली आहे. अमली पदार्थ विरोधी पथाकाच्या वांद्रे युनिटने शुक्रवारी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीला उध्वस्त केलं असून त्यांच्याकडून 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांच्याकडून 225 ग्रॅम कोकेन, 1 किलो 500 मॅफेड्रोन, 335 ग्रॅम एमडीएमए जप्त केलं आहे. 

शुक्रवारी 31 डिसेंबर रोजी वांद्रे अमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे-कुर्ला संकुल रोड वांद्रे या ठिकाणी गस्त करत असताना त्यांना एक नायजेरियन नागरिक दिसला जो संशयास्पद रित्या वावरत होता. जेव्हा त्या पथकाने नायजेरियन नागरिकाकडे चौकशी केली आणि त्याच्याकडे असलेल्या बॅगेची जेव्हा तपासणी केली, त्या वेळेला पोलिसांना त्याच्या बॅगमध्ये कोकेन आणि मॅफेड्रॉन सापडले. पोलिसांनी त्या नायजेरियन नागरिकास अटक केली.  इबे चीनेडू माईक (वय 39) असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी ओडीफे नदुबुसी बारथॉलॉम्यु (वय 40) आणि मंडे ओगबोनीया इगव्यु (वय 38) या दोन आरोपींना नंतर अटक केली.

अटक  करण्यात आलेले आरोपी मुंबई आणि मुंबई उपनगरात असलेल्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये ड्रग्जची विक्री करायचे. तसेच मानखुर्द परिसरातसुद्धा ड्रग्जची विक्री करत होते. या आधी पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार व्हायचे. याच ठिकाणी पोलिसांवर हल्लासुद्धा झाला होता.

अटक करण्यात आलेले आरोपी हे नवी मुंबईच्या वाशी येथे राहत असून ते मुंबई आणि इतर शहरात कपड्यांचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने यायचे आणि ड्रग्सचा व्यापार करायचे. इतकंच नाही तर या तिघांचाही संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्स टोळीशी असण्याची दाट शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. पोलीस आता त्या अनुषंगाने तपास करत आहेत. इबे माईकवर या आधी बंगळुरुमध्ये ड्रग्ज तस्करी करण्यासंदर्भात गुन्हा सुद्धा दाखल आहे..

सदर कारवाई पोलीस सह-आयुक्त मिलिंद भारंबे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अमली पदार्थ विरोधी कक्ष दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नकाSanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.