एक्स्प्लोर
कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार
सुदर्शन शिंदे यांनी आगीत अडकलेल्या नऊ नागरिकांचे प्राण वाचवले.
![कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार Mumbai : Police Constable Sudarshan Shinde who saved victims in Kamla Mills Compound fire felicitated latest update कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/02064050/Sudarshan-Shinde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कमला मिल्स कम्पाऊण्डमध्ये लागलेल्या आगीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण बचावणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलचा पोलिस दलातर्फे सत्कार करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल सुदर्शन शिंदे यांचा मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सोमवारी गौरव केला.
कमला मिल्स कम्पाऊण्डमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीनंतर सुदर्शन शिंदे नागरिकांच्या बचावासाठी धावले होते. अनेक जणांना त्यांनी खांद्यावर टाकून बाहेर आणलं, तर जखमींना त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर्सचीही सोय केली. सुदर्शन शिंदे यांनी आगीत अडकलेल्या नऊ नागरिकांचे प्राण वाचवले.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पहिल्या काही पोलिसांपैकी सुदर्शन शिंदे एक होते. घटनेच्या वेळी ते कमला मिल्स परिसरात ड्युटीवर होते.
'मी फायर ब्रिगेडचे जवान पोहचण्याची वाट पाहत होतो. तेव्हा मोबाईल फोनचे टॉर्च सुरु करुन आपण अडकलो असल्याची माहिती देणारे अनेक जण मला दिसले. तितक्यातच अग्निशमन दल घटनास्थळी आलं आणि मी त्या जवानांसोबत पबमध्ये मदतीसाठी धावलो.' असं सुदर्शन शिंदेंनी सांगितलं.
आगीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आम्हाला वेळ कमी पडत होता. सूर्य कधी उगवला हेच आम्हाला समजलं नाही. वरळी पोलिस आणि एनएम जोशी मार्ग पोलिसांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी वाहनं पाठवली. पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या टीमवर्कमुळे हे शक्य झाल्याचं शिंदे म्हणाले.
कमला मिल्स कम्पाऊण्ड आग प्रकरण
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं
1 Above पबला गुरुवार 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला, तर इतरही अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.
आपण अग्निशमन दलाच्या जवानांसोबत ज्यावेळी रुफटॉप पबमध्ये पोहचलो, तेव्हा चौथ्या मजल्यावरील टेरेसचा दरवाजा बंद (लॉक) होता. जवानांनी दरवाजा तोडला आणि सगळे जण आत शिरलो, असं शिंदे म्हणाले. त्यानंतर वरळी पोलिस स्थानकातील आणखी दोन कॉन्स्टेबल आमच्या मदतीला आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्ही तिघं आगीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करत होतो, असं शिंदेंनी सांगितलं. किती जणांची सुटका केली, हा आकडा लक्षात नाही, मात्र बहुतांश जणांना खांद्यावर टाकून खाली आणलं, तर जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर्सचीही सोय केली, असं सुदर्शन शिंदे म्हणतात.Nothing can compensate the loss of lives in the #KamlaMillsFire but PC Sudarshan Shinde’s efforts to evacuate victims & save lives, deserves being commended. Our prayers are always with the grieving families. pic.twitter.com/tEhTYsTnl3
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) January 1, 2018
![कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/02120240/Sudarshan-Shinde-2.jpg)
संबंधित बातम्या
कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक
कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा
मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे
अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू
कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस
बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार
अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई
1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान
हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री
कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित
भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील
कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'
कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
ठाणे
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)