एक्स्प्लोर

Mumbai Police : मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री करण्यावर 30 दिवस बंदी, मुंबई पोलिसांचे आदेश

Mumbai Police : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत कंदील उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत कंदील (lanterns) उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच चायनीज फ्लाइंग कंदीलांच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर देखील 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईचे डीसीपी (ऑपरेशन) संजय लाटकर (Sanjay Latkar) यांनी हे आदेश जारी केले आहेत. आकाशात कंदील उडवल्यानं मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

 फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी

येत्या 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी प्रतिबंधित असणार आहे. चायनीज कंदील म्हणून समजल्या जाणाऱ्या फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू असेल. या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत. यासोबतच मुंबई पोलिसांनी शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी देखील घातली आहे. मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित आणि मालमत्तेचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळं मुंबईत दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये, यासाठी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा हा आदेश 16 ऑक्टोबर 2022 ते 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 'डी' कंपनीशी संबंधित पाच जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे. त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. यापूर्वी खंडणीच्या प्रकरणात गुंड छोटा शकीलचा मेहुणा, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि व्यापारी रियाझ भाटी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईत सणासुदीचा काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Dawood Ibrahim : दाऊद मोठा डाव खेळण्याच्या तयारीत, तब्बल 800 टन हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्लॅन  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi at Vantara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वाईल्ड लाईफचं उद्घाटनVidhan Sabha : विरोधी पक्षनेतेपदी Bhaskar Jadhav यांची वर्णी, ठाकरेंचे आमदार अध्यक्षांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 05 PM 04 March 2025Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Shubman Gill Travis Head Catch : शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
Embed widget