Mumbai Traffic : जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश, मुंबई पाचव्या तर नवी दिल्ली दहाव्या स्थानावर
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईचा सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील शहरांत पाचवा क्रमांक लागतो.
Mumbai Traffic : जगातील प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी सांगणारा टॉम टॉम ट्राफिक इंडेक्स (tomtom traffic index) जाहीर झाला असून यात मुंबई (Mumbai) पाचव्या स्थानी आहे. मुंबईत तब्बल 53 टक्के वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) आढळून आली आहे, म्हणजेच ज्या प्रवासाला अर्धा तास लागतो त्याच प्रवासाला मुंबईत पाऊण तासापेक्षा जास्त वेळ जातो. मुंबई महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथे दिवसभर कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्याही खूप आहे. त्यामुळेच मुंबईत गर्दी मोठ्या प्रमाणात होत असून यामुळेच वाहतूक कोंडीही होते.
याच इंडेक्समध्ये बेंगलोरु दहाव्या स्थानी तर नवी दिल्ली (Navi Delhi) 11 व्या स्थानी आहे. बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे 48 टक्के वाहतूक कोंडी आढळून आल्याचे इंडेक्स मध्ये सांगण्यात आले आहेत. या इंडेक्समध्ये सहा खंडातील 58 देशांमधील 404 शहरांमधील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून वाहतूक कोंडीचा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.
पहिल्या स्थानी इस्तांबुल शहर
या इंडेक्स मधील पहिल्या स्थानावर म्हणजेच सर्वाधिक वाहतुक कोंडीचे शहर म्हणून तुर्की देशातील इस्तांबुल शहराचा पहिला नंबर आहे, या शहरात 62% वाहतूक कोंडी आढळून येते. यात दुसऱ्या क्रमांकावर रशियातील मॉस्को शहर असून त्यात 61 टक्के वाहतूक कोंडी आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर युक्रेनमधील किव शहर आहे ज्यामध्ये 56% वाहतूक कोंडी आढळून येते. मुंबईच्या आधी चौथ्या स्थानावर कोलंबियाची राजधानी बोगोटा हे शहर आहे. तिथे 55 टक्के वाहतूक कोंडी आढळते असे इंडेक्समध्ये सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा -
- Mumbai Unlock : फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई 100 टक्के अनलॉक? महापौरांनी दिले संकेत
- BMC Election: तब्बल 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक
- Mumbai Corona Update : मुंबईत नव्या 441 कोरोनाबाधितांची नोंद, तर 1,115 जण कोरोनामुक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha