(Source: ECI | ABP NEWS)
Mumbai News: मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद, 'त्या' कर्मचाऱ्यानं सगळंच सांगितलं; नेमकं काय घडलं?
Mumbai News: मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात एका निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक भेट दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या (BMC) कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) एका निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक भेट दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. 'देव आणि देवळांचा धर्म' हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक (Prabodhankar Thackeray Book) वाटल्यामुळे काही महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यावर पुस्तके फेकली आणि माफी मागण्यास भाग पाडले.
Mumbai News: पुस्तक वाटल्यामुळे संताप
30 ऑगस्ट रोजी कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी आपल्या निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहकाऱ्यांना समाजप्रबोधनात्मक पुस्तके भेट दिली. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे 'देव आणि देवळांचा धर्म' हे पुस्तकही होते.
मात्र, पुस्तकातील मजकुरामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत दोन महिला परिचारिकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी राजेंद्र कदम यांच्यावरच पुस्तक फेकले आणि अपमानकारक वर्तन केलं. यावेळी पुस्तक वाटतानाचा वाद आणि अपमानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.
Mumbai News: माझी काय चूक? पण संबंध जपण्यासाठी माफी मागितली : राजेंद्र कदम
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राजेंद्र कदम यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं की, "मी फक्त एक समाजप्रबोधनपर पुस्तक वाटलं, माझी काय चूक? तरीही कार्यालयातील संबंध बिघडू नयेत म्हणून मी माफी मागितली. पण खरंतर मला माफी मागण्याची गरज नव्हती. मला चौकशीची अपेक्षा होती. मात्र मागील दोन महिन्यात कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही. त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Mumbai News: कामगार संघटनेचा संताप
या घटनेनंतर मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक देण्यात काय गैर आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. "निवृत्त कर्मचाऱ्यावर पुस्तके फेकणं आणि सार्वजनिकरित्या अपमान करणं हा गंभीर प्रकार आहे. संबंधित सहाय्यक अधिसेविका, परिचारिका व इतर महिला कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी," अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
MNS Sandeep Deshpande Reaction: मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मूर्खपणाच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. त्यांनी प्रबोधनकार कधी वाचले आहेत का? प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुधारणा वादाकडे नेलं. अनिष्ट प्रवृत्ती विरोधात लढा दिला. त्या प्रबोधनकार ठाकरेंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचे काम सुरू आहे. काल सरन्यायाधीशांवर सनातन धर्माचा अपमान केल्याबद्दल बूट फेकण्यात आला आणि आज हे विष पेरण्याचा प्रकार समाजासाठी घातक आहे. प्रबोधनकारांना हिंदुत्ववाद्यांच्या विरोधी म्हणणं ज्यांनी नवरात्र उत्सवाची सुरुवात केली, त्यांना हिंदुत्ववादी विरोधी म्हणणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. आम्ही या महिलेची योग्य त्या ठिकाणी तक्रार करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा

























