Mumbai News: मालवणीत शोभायात्रेदरम्यान गोंधळ; दोन गटांमध्ये घोषणाबाजी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज
Mumbai Malad News: राम नवमीनिमित्त मुंबईतील मालवणी येथे मिरवणूक सुरू असताना काही काळासाठी दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Mumbai Malvani News: मुंबईच्या (Mumbai News) मालाडमधील (Malad) मालवणी (Malvani) परिसरात रामनवमीनिमित्त (Ram Navmi 2023) निघालेल्या शोभायात्रेत काहीसा गोंधळ उडाल्याची बातमी समोर आली आहे. या शोभा यात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शनं केली. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
मुंबईत काल (गुरुवारी) राम नवमीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. राम नवमीनिमित्त मुंबईतील मालवणी येथे मिरवणूक सुरू असताना काही काळासाठी दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर मिरवणूक पार पडली. मिरवणुकीनंतर पोलिसांनी पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली.
पाहा व्हिडीओ : Malvani Rada : मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात
लोकांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. तणाव निर्माण झालेल्या परिसरासह आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू होतं. तसेच, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ठेवावी, असं आहवानही पोलिसांनी केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल मालवणी येथे रामनवमीनिमित्त शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. शोभा यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झाली होती. दोन गटांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरही सर्व सुरळीत न झाल्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर घटनेप्रकरणी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल