Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राजेश टोपे यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आणि लक्षणं आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घेण्याचं आवाहनही केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी ट्वीट केलं आहे की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी."
राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक! गेल्या महिन्याभरातील कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक
आज 2,543 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण 19,87,804 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.5% एवढे झाले आहे. राज्यात आज 38 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.48% एवढा आहे. मात्र, जनतेने योग्य खबरदारी घेऊन अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने याबाबत सतर्क राहावे असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :