मुंबई महापालिका शाळांमध्ये 10 वी बोर्ड परीक्षा घेण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांच्या विशेष सूचना
बीएमसीच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये दहावी बोर्ड परीक्षा केंद्र असणार.जादा मनुष्यबळाचा वापर करून परीक्षा प्रत्येक केंद्रावर सुरक्षित आणि योग्य खबरदारी घेऊन पार पडावी याबाबत नियोजन.
मुंबई : 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान दहावी बोर्ड परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा देणारे विद्यार्थी व पर्यवेक्षीय यंत्रणा यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी बीएमसीच्या प्रत्येक माध्यमिक शाळेत परिक्षेचे केंद्र करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार, बीएमसी शाळांमधील विद्यार्थी ज्या शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहेत. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, ज्या इमारतीमध्ये माध्यमिक शाळा कार्यरत आहेत त्या शाळा कोव्हीड 19 चे केंद्रसाठी देण्यात येणार नाहीत.
दहावी बोर्ड परीक्षा इतर शिक्षकांच्या सुट्टीच्या कालावधीत होणार असून त्यामुळे मनुष्यबळ कमी पडू नये. यासाठी माध्यमिक शाळांच्या शिक्षकांव्यतिरिक्त प्रत्येक केंद्रावर त्या शाळेतील प्राथमिक विभागातील पर्यवेक्षक म्हणून 10 शिक्षकांची यादी शाळांनी करून ठेवावी व गरजेनुसार त्यांना बोर्डाच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून बोलावले जावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांसोबत शाळेतील चतुर्थ श्रेणीतील 2 कर्मचारी व इमारत हाऊस किपिंगसाठीचे कर्मचारी यांनी परीक्षा कालावधीत उपस्थित राहण्याची सोय शाळांनी करायची आहे.
दहावी बोर्ड परिक्षेसाठी डेस्क, बेंचची कमतरता असल्यास आणि केंद्रप्रमुखाने मागणी केल्यास नजिकच्या शाळेतून त्याची पूर्तता करायची आहे. केंद्रातील वर्गात सर्व सुविधांसोबत सॅनिटायजर, गन मशीन व इतर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता करणे आवश्यक असेल. शिवाय, या उपाययोजनासाठी निधींची गरज भासल्यास शिक्षण आधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात येईल. त्यामुळे यावर्षी दहावी बोर्ड परिक्षेसाठी विशेष नियोजन करत सर्व प्रकारची खबरदारी घेण्यासाठी शाळांनी व्यवस्था करावी अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
SSC HSC Exams 2021 | 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेबाबत घेतलेले महत्वाचे निर्णय काय आहेत?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI