एक्स्प्लोर

Mumbai on Corona Crisis : कोरोना लसीसाठी बीएमसीचं जगातील सहा सिस्टर सिटीजना पत्र, 1 कोटी 80 लाख डोसची मागणी

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. त्यातच काल एका पुरवठादाराने ग्लोबल टेंडरमधून माघार घेतल्यानंतर मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्या अनुषंगाने सहा सिस्टर सिटीकडे लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने जगातील सहा सिस्टर सिटीजकडे लसपुरवठ्याची मागणी केली आहे. सेंट पीटर्सबर्ग (रशिया), न्यू यॉर्क (अमेरिका), लॉस एंजेलिस (अमेरिका), बुसान (दक्षिण कोरिया), स्टुटगार्ट (जर्मनी) आणि योकोहोमा (जपान) या शहरांतील महापौरांना मुंबई महापालिकेकडून पत्रे रवाना झाली आहेत. 

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. त्यातच काल एका पुरवठादाराने ग्लोबल टेंडरमधून माघार घेतल्यानंतर मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्या अनुषंगाने सहा सिस्टर सिटीकडे लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

मुंबईच्या सहा सिस्टर सिटीजसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांसंदर्भात यापूर्वी संबंध आले आहेत. तिथले अधिकारी-महापौर यांच्या भेटीगाठीही होत असतात. याच नात्याची आठवण करत कोविड काळात मदत करण्याचं आवाहन बीएमसीने केलं आहे.

सध्याच्या कठीण काळात मुंबईला कोविडशी लढण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता असल्याचे या पत्रांमध्ये म्हटलं आहे. तसंच, या शहरांनी यशस्वीपणे कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे, मुंबई शहरालाही त्यांनी मदतीचा हात द्यावा आणि उपलब्ध असतील त्या लसीचे 1 कोटी 80 लाख डोस द्यावेत अशी मागणी केली आहे. या लसीच्या डोसची किंमत कळवून पुढील व्यव्हार ठरवावा असंही या पत्रांत नमूद केलं आहे.

लस नाही, पण आर्थिक मदत करु : जपानच्या योकोहोमा शहराचं पत्राला उत्तर
या सहा शहरांपैकी जपानमधील योकोहोमा या शहराने या पत्राला उत्तर दिलं आहे. आपल्या सध्या लस उपलब्ध नाही पण मुंबईसाठी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी पत्राद्वारे महापालिकेला दिलं आहे.

बीएमसीच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून एका पुरवठादाराची माघार
मुंबई महापालिकेनं कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. एक कोटी लसींचे डोस खरेदी करण्यासाठी 8 पुरवठादार आले होते. यातील एक पुरवठादार फायझर कंपनीची अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणार होता. परंतु, कोणतंही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे. दरम्यान, 7 पुरवठादारांबरोबर चर्चा सुरु असून कोरोनाची तिसरी लाट धडकण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस टोचण्याचे उद्दिष्ट असल्याचं पालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Bus Accident : भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Embed widget