मुंबई महापालिकेवर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; भाजप आमदार योगेश सागर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा मुंबई महापालिकेने (BMC) अजमेरा बिल्डरला दिल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर (yogesh sagar ) यांनी केला आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) अजमेरा बिल्डरला पाचशे कोटींचा फायदा करून दिल्याचा आरोप भाजपचे आमदार योगेश सागर (Bjp Mla Yogesh Sagar) यांनी केला आहे. आमदार योगेश सागर (yogesh sagar ) यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे.
"उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा अजमेरा बिल्डरला दिल्याचा आरोप आमदार योगेश सागर यांनी पालिकेवर केला आहे. "मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतु, मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्याने आणि खेळाची उद्याने नष्ट झाली आहेत. या परिस्थितीत पालिकेच्या ताब्यातील उद्यानासाठी आरक्षित कोणतेही अतिक्रमण नसलेला बांधकामासाठी योग्य भूखंड अजमेरा बिल्डरला दिला आहे. त्याबदल्यात अजमेरा बिल्डरकडून बांधकामायोग्य आणि परवानग्यांच्या फेऱ्यात अडकणारा भूखंड मुंबई महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनसाठी आपल्या ताब्यात घेतला आहे." असा आरोप आमदार सागर यांनी मुत्र्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर मोठा लढा देणार
महापालिकेने केलेल्या पाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाला तत्काळ स्थगित करण्यात येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. शिवाय या निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर याविरोधात भाजप मोठा लढा देईल असा इशारा आमदार योगेश सांगर यांनी सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे.
या भ्रष्ट्राचारातून मुंबईकरांची हक्काची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या साथीदारांनी घातला आहे, असा गंभीर आरोप आमदार योगेश सागर यांनी केला आहे. दरम्यान, सागर यांच्या या आरोपांवर पालिका आता काय उत्तर देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई, BMC चा मोठा निर्णय
- COVID 19 Cases In Mumbai : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? 7 दिवसांत कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 1300 वरुन 15 हजारांवर
- Mumbai Lockdown : तिसरी लाट धडकली? मुंबईकरांनो पुढील आठवडा जिकरीचा; रुग्णसंख्येत 20 ते 30 टक्क्यांची वाढ