Mumbai Rain Local Train Updates: मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी सावधान; मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वेची परिस्थिती काय?
Mumbai Rain Updates: मुंबईत मुसळधार पाऊस, कुठे रेल्वे ट्रॅकखालची खडी वाहून गेली, कुठे ट्रॅकवर पाणी साचलं, रेल्वे ट्रेनची परिस्थिती काय?

Mumbai Local Train Updates: गेल्या काही तासांपासून मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर परिणाम झाला आहे. मु्ंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील दादर, माटुंगा आणि सायन या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. दादर परिसरात रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची (Western Railway) वाहतूक उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावर विरारकडून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकही 15 ते 20 मिनिटांच्या उशिराने सुरु आहे. (Mumbai Rain news)
Trans Harbour Railway : वाशी - ठाणे ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गावरील रुळांखालची खडी वाहून गेली, वाहतुक सुरु पण ट्रेन उशिराने
मुसळधार पावसामुळे वाशी - ठाणे ट्रान्सहार्बर रेल्वे बंद झाली होती. कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली होती.. ट्रान्स हार्बरच्या दोन्ही मार्गिका 45 मिनिट बंद झाल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. ट्रांस हार्बर मार्गावर तुर्भे आणि कोपरखैराणे दरम्यान अप मार्गिकेवर सकाळी 5 वाजून 6 मिनिटांपासून आणि डाऊन मार्गिकेवर सकाळी 5 वाजून 50 मिनिटांपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. सध्या पावसाचा जोर ओसरल्याने रेल्वे ट्रॅकवरील पाणी कमी झाले आहे. अप लाईन 7 वाजून 27 मिनिटांनी आणि डाऊन लाईन 7 वाजून 35 मिनिटांनी सुरू झाली असून दोन्ही मार्गिकेवर स्पीड लिमिट देण्यात आले आहे. (Mumbai Local Train Updates)
Thane Rain updates : ठाण्यात मुसळधार पाऊस
ठाणे शहरात रात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय. सध्या पावसाचा जोर ठाणे शहरात कमी झालेला आहे. काही सखल भागात पाणी साचलं होते. मात्र, सध्या ठाणे मार्केट असेल किंवा तलावपाळी या भागांपैकी कुठेही पाणी साचलेलं नाही त्यामुळे वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू आहे. ठाण्याला सुद्धा हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
आणखी वाचा
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू






















