एक्स्प्लोर
अखेर वादग्रस्त आदर्श इमारतीवर लष्कराचा ताबा
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अखेर वादग्रस्त आदर्श इमारत आज लष्करानं ताब्यात घेतली. 31 मजल्यांची ही इमारत उभारताना जमीन अधिग्रहणापासून परवानग्या देण्यापर्यंत सगळीकडे नियम आणि कायद्यांचं उल्लंघन झाल्याचा ठपका हायकोर्टानं ठेवला होता.
विशेष म्हणजे आदर्श घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची खुर्ची गमवावी लागली. तर डझनभर आयएएस अधिकारी गजाआड झाले होते.
त्या पार्श्वभूमीवर ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आदेश रद्द करत, इमारत केंद्र सरकारला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज लष्कराने इमारत ताब्यात घेतली.
संबंधित बातम्या
वादग्रस्त आदर्श इमारत ताब्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement