एक्स्प्लोर

Mumbai Metro Phase 3 : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती

Mumbai Metro Phase 3 : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या 12 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. 

Mumbai Metro Phase 3 : मुंबई : महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुंबई मेट्रो-3 (Mumbai Metro 3) च्या सीप्झ ते बीकेसी (Seepz To BKC) या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या 12 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना गूड न्यूज देत सप्टेंबर अखेरपर्यंत मुंबई मेट्रो-3 चा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल, असं सांगितलेलं. ही मेट्रो सेवा आरे ते बीकेसी आणि पुन्हा बीकेसी ते आरे इथपर्यंत धावणार आहे. मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यात दहा स्थानकं असतील. मुंबई मेट्रो 3 मार्गिका 33.5 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईच्या उत्तर-दक्षिण दिशांना अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानकं असतील. मेट्रो लाईन 3 33.5 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईच्या उत्तर-दक्षिण दिशांना अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी डिझाईन केलेली आहे. हा मेट्रो मार्ग मुंबईतील सहा प्रमुख व्यावसायिक क्षेत्र, 30 कार्यालयीन क्षेत्र, 12 शैक्षणिक संस्था, 11 प्रमुख रुग्णालयं आणि 10 वाहतूक केंद्रांना जोडेल. याशिवाय, हा मेट्रो मार्ग शहरातील दोन्ही विमानतळांना देखील जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. 

मुंबईकरांची मेट्रो 3 मार्गिका कशी असणार? 

मेट्रो 3 मार्गिका भूमिगत असणार आहे. ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत 65 किमी प्रतितास वेगानं धावणार आहे. सध्या या मेट्रोचा 5 ते 10 किमीचा ट्रायलरन करण्यात येतोय. दरम्यान मेट्रोची क्षमता ही 100 किमी प्रतितास प्रवास धावण्याची आहे. ही संपूर्ण मेट्रो भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आलीये. मुंबईत मेट्रो 3 च्या सध्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो  ड्रायव्हरलेस असणार आहे. 

मेट्रोच्या स्थानकांचं जवळपास 100 टक्के काम पूर्ण झालंय. मेट्रोत प्रवेशाकरता फलाटावरच फुल स्क्रीन डोअर असणार आहे. रुळांवरचे अपघात किंवा आत्महत्येची 0 टक्के शक्यता यामध्ये असणार आहे. तसेच ही स्थानकं इंडिकेटर, एक्सलेटर,सीसीटीव्ही यांसारख्या सुविधांनी अद्यायावत असतील. मेट्रोच्या फलाटावर लिफ्टची सोय करण्यात आलीये. दिव्यांगांकरता विशेष शौचालय, बेबी डायपर चेंजींग रुम मोफत इंटरनेट,  वायफाय सुविधा  देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या महत्त्वाच्या बाबी

  • मुंबई मेट्रो 3 मार्गिका ही 33.5 किमीची असून एकूण 27 मेट्रो स्थानकं आहेत, त्यातील 26 मेट्रो स्थानकं ही अंडरग्राउंड आहेत. 
  • डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी स्टेशन दरम्यान साडेअकरा किलोमीटरची फेज 1 लाईन सुरू केली जाईल.
  • यासाठी मेट्रोच्या विविध चाचण्या या लाईनवर सुरू आहेत.
  • फेज 1 मध्ये एकूण 9 गाड्या सुरवातीला चालवण्यात येणार असल्याचं नियोजन आहे. 
  • फेज 2 बीकेसी ते कफ परेड हा जून 2024 पर्यंत पूर्ण करून संपूर्ण मेट्रो 3 लाईन सुरू करण्याचा प्रयत्न राहील 
  • मात्र जो प्रकल्प 2021 मध्ये पूर्ण होणार होता, तो प्रकल्प अडथळ्यांची शर्यत पार करत तीन वर्ष विलंबानं सुरू होणार आहे. त्यामुळे बारा ते पंधरा हजार कोटी रुपयांनी खर्च वाढणार आहे. 
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसर, पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाटं उद्घाटनं केलं जाणार आहे. 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget