एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महापालिकेच्या कामात मुख्यमंत्र्यांची ढवळाढवळ : महाडेश्वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
मुंबई : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पावसासोबतच सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची चिखलफेक सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
मुंबईची तुंबई होणार नाही यासाठी दरवर्षी प्रयत्न केले जातात. दरवर्षी शिवसेना-भाजप एकमेकांना पाण्यात पाहते. यंदाही याच मुद्दयावरुन महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपली आहे.
'महापालिकेच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक असेल तर पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं जातं. तसं, आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बाबत जी बैठक आयोजित केली होती, तिला मुंबईच्या महापौरांना आमंत्रित केलं असतं, तर राज्य सरकारच्या अखत्यारित येणारी जी प्राधिकरणं काम करत नाहीत, त्यांच्याविषयी प्रश्न मांडले असते. म्हणजे पावसाळ्यात मुंबईकरांना होणारा त्रास कमी झाला असता', असं महापौर सांगतात.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करु शकतात, मात्र मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून महापौरांना बैठकीतील निर्णयांबाबत माहिती देणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, असा आरोप विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
पालिका अधिकाऱ्यांवर दबाव असल्यास कामात व्यत्यय येऊ शकतो. मुख्यमंत्री जाणीवपूर्वक हस्तक्षेप करत आहेत का, की त्यांचा काही हेतू आहे, हे समजत नसल्याचंही महाडेश्वर म्हणाले.
मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यावरही यावेळी महापौरांनी निशाणा साधला. पालिका आयुक्त हुकूमशहा असल्याचा घणाघातही महाडेश्वरांनी केला.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement