(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime News | Ludo मध्ये वारंवार पराभूत होत असल्यामुळं मित्राकडूनच मित्राची हत्या आणि अंत्यसंस्कार
10 हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले आणि मित्राचे अंतिम संस्कारही केल्याची धक्कादायक घटना मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.
मुंबई : मोबाईल मधील (Ludo) लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात संतप्त मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना घडली ही बाब उघडकीस नये म्हणून या मित्रानेच 10 हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले आणि मित्राचे अंतिम संस्कारही केल्याची धक्कादायक घटना मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.
पोलिसांकडे सदर प्रकरणीची तक्रार दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. 17 मार्च 2021 रोजी मृतक तुकाराम नलवडे (52) आणि त्याचा मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी (वय 34) हे मालाड दारू वाला कंपाऊंडमध्ये मोबाइलवर लुडो गेम खेळत होते. ज्यामध्ये मृत तुकाराम वारंवार जिंकत होता, त्याचा राग काढत त्याचा मित्र जिमीने तुकाराम सोबत भांडण सुरू केल भांडण इतक वाढलं की जिमीने तुकारामला बेदम मारहाण केली.
ही मारहाण इतक्या गंभीर स्वरुपाची होती, की त्याचा जागीच मृत्यू झाला. तुकारामच्या निधनानंतर जवळच्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेले जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दुसरीकडे, तुकारामच्या मृत्यूनंतर आरोपी जिमीने बोरिवलीतील खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने 10 हजार रुपयांचे नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आणून मृतक परिवाराला दिले. मालाडच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले.
Jammu Kashmir | अहो आश्चर्यम्! जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची कमान तयार
यानंतर तुकारामला आदरांजली देण्यासाठी शोक सभा आयोजित करण्यात आली होती त्या शोकसभेत उपस्थित असलेल्यांपैकी एकाने मृताकच्या पत्नीला तुकारामच्या मृत्यूचे कारण सांगितले त्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांना, मृत्यू नैसर्गिक नव्हे तर प्राणघातक हल्ल्यामुळे झाला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मृताच्या पत्नीने मालाड पोलिस स्टेशनमध्ये शेजारच्या मित्रांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मालाड पोलिसांनी याप्रकरणी 20 मार्च रोजी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताबडतोब अटक केली आहे.